आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटी महिला पाहून करू लागले असे काम, विरोध केल्याने तिच्या शरीरात टाकला रॉड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत महिला व आरोपी. - Divya Marathi
मृत महिला व आरोपी.
पाटणा - पाटणा जिल्ह्यातील नौबतपूरमध्ये घरातून बाहेर निघालेल्या महिलेला गावातील दोन तरुणांनी पकडले आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याचा विरोध केल्यावर दोघांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड आकला आणि फरार झाले. रक्तबंबाळ झालेली महिला कशीबशी घरी पोहोचली, तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
 
ऑपरेशन टेबलवर तोडला दम...
- महिला बुधवारी संध्याकाळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. तिला एकटी पाहून गावातील धीरज आणि धर्मेंद्र यांनी अगोदर रेपचा प्रयत्न केला.
- पण ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी न झाल्याने महिलेच्या तोंडात बोळा कोंबून त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला.
- घटनेनंतर महिलेला अगोदर नौबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तिथून तिला सरकारी रुग्णालयात हलवले.
- येथे ऑपरेशन टेबलवर तिची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांच्या मते, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
- पोलिसांनी याप्रकरणी आरोपी धीरजला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी धर्मेंद्रचा शोध सुरू असल्याचे म्हटले.
 
त्यांना फाशी द्या... मृत महिलेच्या मुलीची मागणी
- महिलेला दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्व लहान आहेत. सर्वात मोठी मुलगी 15 वर्षांची, तर सर्वात लहान मुलगा 7 वर्षांचा आहे.
- महिलेच्या आईवडिलांचा तिच्या लहानपणीच मृत्यू झालेला असल्याने तिच्या मावशीने तिचा सांभाळ केला. निधनाची बातमी कळताच मावशीने रुग्णालयात पोहोचून मोठा आक्रोश केला. 
- मृत महिलेच्या मोठ्या मुलीने सरकार आणि पोलिसांना असा न्याय देण्याची विनंती केली की दिल्लीच्या निर्भया कांडप्रमाणे तिच्या आईचा खून करणाऱ्या नराधमांनाही फाशी द्यावी.
- रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...