आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमधील महाप्रलय: मृतदेहांचा खच, कोंडलेले श्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडात परिस्थिती अद्याप बिकट आहे. महाप्रलयात आजवर 5 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यशपाल यांचा दावा असून डोंगरांत अडकलेल्यांना वाचवणे आव्हान ठरत आहे. सोमवारपासून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला असल्याने दुर्गम भागांत अडकलेल्यांचे काय होणार, याची सर्वांना चिंता आहे. तथापि, कोणत्याही परिस्थिती बचावकार्य थांबणार नाही, अशी प्रतिज्ञाच जणू भारतीय लष्कराने केली आहे. अडकून पडलेल्यांचे तर हालच आहेत. जागोजाग विखुरलेले मृतदेह व आठ दिवसांपासून अन्न-पाणी नसल्याने त्यांचा श्वास गुदमरतो आहे. रोगराईचा धोका आहे.


आठ दिवसानंतर
वाढते आकडे
680 मृतदेह सापडले
80 हजार लोकांना वाचवले
19हजार अजून अडकलेले


खरे हीरो
8000 जवान लष्कर, हवाई दलाचे
7000 आयटीबीपी, आपत्ती व्यवस्थापन
150 पॅराट्रुपर्सचे डोंगरद-यांत बचावकार्य


मावळत्या आशा
बचाव पथक पोहोचू शकत नाही अशा दुर्गम भागात अडकलेल्या हजारो लोकांचा जीव वाचवण्याचे आव्हान.


वाढता धोका
सर्व मृतदेह काढता आलेले नाहीत. दबलेल्या व नदीत तरंगणा-या मृतदेहांमुळे रोगराईचा धोका.