आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीक मागतेय करोडपती गुटखा किंगची ही मुलगी, असे आहे हायव्होल्टेज प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजल अरोरा प्रसिद्ध पानमसाला बिझनेसमन दिलबाग अरोरा यांची नात आहे. - Divya Marathi
काजल अरोरा प्रसिद्ध पानमसाला बिझनेसमन दिलबाग अरोरा यांची नात आहे.
कानपूर - शहराच्या साई धाम मंदिराच्या बाहेर गुरुवारी एक मुलगी जीन्स-टॉपमध्ये भीक मागताना नजरेस आली. तिच्या एका हातात कटोरा होता, तर दुसऱ्या हातात पानमसाल्याच्या अनेक पुड्या होत्या. तिच्यासोबत एक पोस्टरही होते, ज्यावर लिहिले होते की, "दिलबाग पानमसाले वाल्याची नात भीक मागत आहे.''
 
असे आहे प्रकरण
- मंदिराच्या समोर भीक मागणाऱ्या मुलीचे नाव काजल अरोरा आहे. ती सुप्रसिद्ध पानमसाला ब्रँड दिलबाग पानमसालाचे मालक दिलबाग अरोरा यांची नात आहे.
- भीक मागण्याचे कारण विचारल्या काजल म्हणाली, मी दिलबाग अरोरा यांचा मुलगा अरुण अरोरा यांची लीगल मुलगी आहे. त्यांनी माझ्या आईशी लग्न केले होते, परंतु फक्त 2 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट दिला होता. मी आई सरळ स्वभावाची आहे. तिने कधीच आपला हक्क मागितला नाही. पण मी माझ्या वडिलांकडून माझा हक्क घेऊनच दाखवणार. मी त्यांच्या घराण्याची एकुलती एक वारस आहे.
- काजल बीए फायनल इयरची विद्यार्थिनी आहे. ती कानपूरच्या साकेतनगरमध्ये आपली आई रितू अरोरा यांच्यासोबत राहते. मंदिरावर झालेल्या या हायव्होल्टेज ड्रामामध्ये रितू अरोराही आपल्या मुलीसोबत उभ्या असलेल्या दिसल्या.
 
2 लाख देऊन घेतला घटस्फोट
- कानपूरचे प्रतिष्ठित बिझनेसमन दिलबाग अरोरा यांची सून रितू म्हणाल्या, माझे वडील ज्ञानेंद्र जौहरी कस्टम इन्स्पेक्टर होते. निवृत्तीनंतर त्यांनी दिलबाग गुटखा फॅक्ट्री जॉइन केली. तिथे त्यांची मालकाशी चांगली मैत्री झाली.
- रितु म्हणाल्या, 1994 मध्ये माझ्या वडिलांकडे दिलबाग यांनी त्यांचा मुलगा अरुणसाठी मला लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
- अरुण अगोदर विवाहित होता. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यामुळे माझ्या वडिलांनी तेव्हा नकार दिल्यावर दिलबागजी जोर देऊन म्हणाले होते की, मुलगा नक्कीच सुधारेल.
- लग्नाच्या 2 वर्षांनीच 1996 मध्ये अरुण अरोरा यांनी रितू यांना घटस्फोट दिला. यादरम्यान रितू एका मुलीची आई बनल्या होत्या. रितू म्हणाल्या, त्यांचे पतीने कॉम्पेनसेशनच्या नावावर फक्त 2 लाख रुपये दिले होते.
- त्या पुढे म्हणाल्या की, मला घटस्फोट दिल्यावर अरुणने आणखी 2 लग्ने केली. पण कुठलीच बाईही टिकली नाही, आणि संतानही झाली नाही.
 
57व्या वर्षी 5व्या लग्नाची तयारी
- काजल म्हणाली, मी काही दिवसांपूर्वीच माझे वडील अरुण अरोरा यांना फोन करून म्हणाले की, मी तुमची मुलगी बोलत आहे. त्यांनी अगोदर माझे हालचाल विचारले आणि म्हणाले- मी एक मुलगी पाहिलीय, तिच्याशी 5वे लग्न करणार आहे.
- त्यांच्या या गोष्टीचा मला प्रचंड राग आला. मी जेव्हा त्यांना माझा हक्क मागितला, तर म्हणाले- मी तुला माझा वारस बनवणार नाही. तुला काय करायचे ते कर. माझा तुझ्याशी काडीचाही संबंध नाही.
- काजल म्हणाली, मी त्या प्रत्येक जागी भीक मागणार आहे, जिथे त्यांची प्रॉपर्टी आहे. हे मंदिरही माझ्या आजोबांनीच बांधले होते. आता पुढचे टारगेट त्यांची फॅक्ट्री आणि बंगला असेल. जर एनडी तिवारीच्या अनौरस मुलाला त्याचा हक्क मिळू शकतो, मग इथे तर मी औरस मुलगी आहे. हक्क घेऊनच दाखवीन.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...