आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहिदाला अखेरची सलामी, ध्‍वजारोहणानंतर दोन दहशतवाद्यांना एकट्याने मारले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामताडा (झारखंड) - श्रीनगरच्‍या नौहट्टा चौकात झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात सोमवारी शहीद झालेले CRPF चे कमांडेंट प्रमोद कुमार यांच्‍यावर आज (मंगळवार) शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. मुलीने त्‍यांना मुखाग्‍नी दिला. हल्‍ल्‍यापूर्वी सोमवारी त्‍यांनी आपल्‍या तुकडीकडून स्‍वातंत्र्य दिवसाची सलामी घेतली होती. त्‍या नंतर काहीच वेळात हल्‍ल्‍याची माहिती मिळाली आणि कुमार यांच्‍या तुकडीने मोर्चा संभाळाला. या चकमकीत त्‍यांनी एकट्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले. नंतर ते शहीद झाले. विशेष म्‍हणजे 11 दिवसांपूर्वीच त्‍यांच्‍यावर पेट्रोल बॉम्‍बने हल्‍ला झाला होता.
झेंडा वंदानाच्‍या एका तासानंतरच चकमक ...
> सोमवारी झेंडावंदन झाल्‍यानंतर प्रमोद कुमार यांनी आपल्‍या जवानांना संबोधित केले होते.
> त्‍यांनी सकाळी 8.29 वाजता झेंडावंदन केले.
> ते म्‍हणाले होते, ''आपली जबाबदारी वाढली आहे. दहशतवाद आणि दगडफेक करणाऱ्यांचे आवाहन आहे. त्‍यांच्‍याशी निडर होऊन लढावे लागणार आहे. ते मेह‍ननतीचे शक्‍य होणार आहे. मन लावून कार्य कारा. '
> त्‍याच्‍या एक तासानंतरच सकाळी 9.29 वाजता दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. प्रमोद कुमार यांच्‍याकडेच तुकडीचे नेतृत्‍व होते.
> दहशतवादी ज्‍या घरातून गोळीबार करत होते त्‍या घराच्‍या खूप जवळ जात त्‍यांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले.
> सकाळी 11 वाजता त्‍यांच्‍या कुटुंबीयांना फोन आला की त्‍यांच्‍या डोक्‍याला गोळी लागून ते शहीद झाले.
> बिहारचे बख्तियारपूर येथील ते मूळ रहिवासी होते. 15 ऑक्‍टोबर 1972 रोजी त्‍यांचा जन्‍म झाला. जामताडामध्‍ये ते लहानचे मोठे झाले.
> येथे त्‍यांचे वडील रेल्‍वेत होते. त्‍यांच्‍या पश्‍यात त्‍यांचे आई- वडील पत्नी आणि सात वर्षांची एक मुलगी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि चौथ्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO
बातम्या आणखी आहेत...