आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुऱ्हानच्या गावी टॉवरवर होता PAKचा झेंडा, जवानाने जीवाची बाजी लावून फडकावला तिरंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन यांच्या सहकाऱ्यांनी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. - Divya Marathi
सचिन यांच्या सहकाऱ्यांनी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने या घटनेचा व्हिडिओ तयार केला.
श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या त्राल भागात मोबाइल टॉवरवर लावण्यात आलेला पाकिस्तानचा झेंडा काढण्यासाठी सीआरपीएफचे जवान सचिनकुमार यांनी जीवाची बाजी लावली. स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचा झेंडा फडकलेला पाहिल्यानंतर सचिनकुमार बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करुन 50 मीटर उंच टॉवरवर चढले. त्यांनी पाकिस्तानी झेंडा काढून तिथे भारतीय तिरंगा ध्वज लावला. एवढेच नाही तर या जवानाने एवढ्या उंचीवर तिरंगा फडकावल्यानंतर त्याला सॅल्यूट केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ड्रोन कॅमेराने बनवला व्हिडिओ
- 8 जुलै रोजी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला दहशतवादी बुऱ्हान वनी त्राल भागातील रहिवासी होती. तो मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला होता. यात आतापर्यंत 55 लोक मारले गेले. एक महिन्यापेक्षा जास्त काळ कर्फ्यू होता.
- या पार्श्वभूमीवर सोमवारी काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
- सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांना सुचना दिलेल्या होत्या की कुठेही पाकिस्तानचा झेंडा फडकता कामा नये.
- सर्चिंग दरम्यान 50 मीटर उंच एका मोबाइल टॉवरवर पाकिस्तानचा झेंडा फडकताना दिसला होता.
- तो झेंडा काढण्यासाठी कॉन्स्टेबल सचिन कुमार टॉवरवर चढले. त्यांनी तिरंगा फडकावल्या नंतर त्याला सॅल्यूट केला.
- या घटनेचा व्हिडिओ सचिन यांच्या सहकाऱ्यांनी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...