आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cullesness Hight: Came Through Graveyard , Wonder In Autoriksha

निर्दयीपणाचा कळस: स्मशानातून आले, रिक्षातून फिरले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - पाकिस्तानची सरहद्द ओलांडून घुसलेल्या तीन शस्रसज्ज दहशतवाद्यांनी अगदी जम्मूत पाय ठेवल्यापासून अत्यंत कठोरपणे हल्ल्याची योजना तडीस नेली. पहाटे जम्मूत येताच दोन चालकांना बंदूकीच्या धाकावर त्यांनी सांबा व परिसरात फेरफटका मारला होता असे आता उघडकीस आले आहे.हिरानगर पोलिस ठाण्यावर हल्ला करून त्यांनी एक ट्रक पळवला व लष्करी तळावर हल्ला केला.


16 ते 19 वयोगटातील तीन दहशतवाद्यांचा प्रवास रोशनलाल रिक्षाचालकाने कथन केला. रोशनलाल भाजीपाल्याची वाहतूक करणारी लोडिंगरिक्षा चालवतो. अतिरेक्यांशी प्रथम त्याचीच गाठ पडली. जम्मूभागातील हरिया चौकात असलेल्या एका नर्सरीजवळील स्मशानभूमीतून अचानक हे तिघे समोर आले.त्यांनी माझ्या डोक्यावर बंदूक लावली व सांबा येथील लष्करी तळावर नेण्यास सांगितले. हे तिघेही एकमेकांशी चास्त उर्दू भाषेत बोलत होते. त्यांचे बुटे चिखलाने माखलेले होते. रिक्षाचालक रोशनलाल याला संशय आल्याने त्याने लष्करी तळाकडे जाण्यास नकार दिला.मात्र त्याने नकार देताच तिघा दहशतवाद्याने त्याला बेदम मारहाण केली. नंतर अचानक त्यांच्या म्होरक्याने त्याला रिक्षा राष्ट्रीय महामार्गाकडे वळवण्यास सांगितले. तिघांपैकी एक जण चालकाच्या सीटवरच बसला होता. असे रोशनलाल याने सांगितले.


रिक्षाचालकावरही गोळ्या झाडल्या
जम्मूभागातील गल्ली बोळातून फेरफटका मारून रिक्षा हिरानगर महामार्गावर पोहोचली. तिथे दोन पोलिस दिसताच दहशतवाद्यांनी जवळपास पोलिस ठाणे आहे का अशी विचारणा केली. रोशनलालने त्यांना ठाण्यानजीक नेले. ठाण्यानजीक पोहोचताच रोशनलालने पटकन रिक्षातून बाहेर उडी मारली. परंतु निर्दयी दहशतवाद्यांनी त्याच्यावरही गोळ्या झाडल्या.


पोलिसांना सावरण्याची संधीच दिली नाही
हिरानगर पोलिस ठाण्यात घुसताच प्रथम हवालदार शिवकुमारला ठार मारण्यात आले.त्यानंतर सहायक फौजदार रतनसिंग,हवालदार प्रदीप जमवाल,रतन चांद आणि एसपीओ मुकेशकुमार यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. या पोलिसांनी पोझिशन घेण्याचा प्रयत्न केला परंतु अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत त्यांना सावरण्याचीही संधी दिली नाही.


पोलिस ठाण्याच्या छतावर चढून गोळीबार
ठाण्यातील सर्व पोलिसांना मारल्यानंतर हे तिघे ठाण्याच्या छतावर चढले व त्यांनी सहायक फौजदार गग्गू राम यांना ठार मारले.तिथून बाहेर पडल्यावर समोर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये लष्करी तळावर जाण्याचा त्यांचा इरादा होता परंतु क्लिनर फिरोज अहमद याने त्यांना नकार देताच त्यालाही ठार मारण्यात आले. एका पीसीओ चालकालाही गोळ्या घातल्या.त्यानंतर ट्रक पळवूला लष्करी तळावर हातबॉम्ब फेक ला.यात सेन्ट्री जागीच ठार झाला. ट्रक चालकाने तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात त्याची माहिती दिली.