आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्याच्या एन्काऊंटरनंतर काश्मीरच्या विविध भागात कर्फ्यू, 8 जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बऱ्हान वणीच्या एन्काऊंटरनंतर काश्मीरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. - Divya Marathi
हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बऱ्हान वणीच्या एन्काऊंटरनंतर काश्मीरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.
श्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बऱ्हान वणीच्या एन्काऊंटरनंतर पुलवामा आणि श्रीनगरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दोन्ही शहरांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. खोऱ्यातील तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा आणि रेल्वे सेवा बंद केली गेली आहे. बऱ्हान वणीच्या एन्काऊंटर नंतर एक मोठा खुलासा झाला आहे. अशी माहिती आहे की बुऱ्हानची माहिती त्याच्या गर्लफ्रेंडनेच पोलिसांना दिली होती. बुऱ्हानचे अनेक मुलींसोबत संबंध होते. त्यामुळे ती त्याच्यावर नाराज होती.
> मीडिया रिपोर्टनुसार, बुऱ्हानच्या गर्लफ्रेंडनेच सुरक्षा यंत्रणांना तो अनंतनाग येथे येणार असल्याची माहिती दिली होती. त्याचे इतर मुलींसोबत असलेल्या संबंधाने ती त्रस्त होती.
> वणी हा वाँटेड दहशतवादी होता. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षिस होते.
हुर्रियत नेते नजरकैद
> शुक्रवारी रात्री हुर्रियतच्या अनेक बड्या नेत्यांना हाऊस अरेस्ट करण्यात आले. बुऱ्हानच्या मृत्यूनंतर खोऱ्यात त्यांनी कोणते आंदोलन करु नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली.
> हिज्बुलचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जात असलेला बुऱ्हान वणी (22 वर्षे) जम्मू-काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
> त्याचे दोन साथीदारही मारले गेले.
कोण होता बुऱ्हान वणी
> गेल्या काही महिन्यांपासून बुऱ्हाण दक्षिण काश्मीरच्या भागात अॅक्टिव्ह होता. त्याने येथील अनेक सुशिक्षित तरुणांना आपल्या संघटनेत सहभागी करुन घेतले होते.
> काश्मीरी तरुणांच्या रिक्रूटमेंटसाठी त्याने सोशल मीडिया अर्थात फेसबुक, व्हॉट्स अॅप यांचा पुरेपूर वापर चालवला होता. तो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत होता. यात तो शस्त्रांसह संरक्षण दलाची खिल्ली उडवताना दिसत होता.
> बुऱ्हान स्फोटक भाषणे आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात एक्सपर्ट मानला जात होता.

श्रीमंत कुटुंबातील होता
> वणी काश्मीरच्या दक्षिण भागातील त्राल गावातील एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता.
> त्याचे वडील येथील एका शाळेत मुख्याध्यापक होते.
> मोठ्या भावाला काही जवानांनी मारहाण केल्याच्या समजल्यावर चिडून जाऊन 2010 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी तो घरातून पळून गेला आणि हिज्बुल मुजाहिदीनचा सदस्य झाला होता.
> त्याच्या प्रक्षोभक व्हिडिओमुळे तो गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमधील कट्टरपंथी नागरिकांमध्ये लोकप्रिय झाला होता.
> घरातून पळून जाण्यापूर्वी बुऱ्हान वर्गातील हुषार विद्यार्थी होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...