आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांबाहेर रांगेत उभे राहून पैशांचा संचय, परराज्यांतील रुग्णांना अडचण येऊ नये यासाठी सुट्या पैशांचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - रायपूरच्या माखिजाचे ३७ वर्षीय रहिवासी संदीप १२ दिवसांपासून सलग बँकेबाहेर रांगेत उभा असतात. ५०० व १००० रुपयांचे सुटे करण्याच्या ते प्रयत्नात आहेत. नोटा बदलण्यासाठी कधी त्यांना ३ तास तर कधी त्यापेक्षा जास्त वेळ लागतो.

पैसे काढल्यानंतरचे वास्तव साई हार्ट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळते. रुग्णालयात अन्य राज्यांतून येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांना सुटे पैसे मिळावेत हा त्यांचा प्रांजळ उद्देश. त्यांचे चार मित्रही या कामात गुंतले आहेत. याशिवाय ते अन्य व्यावसायिकांकडून सुटे पैसे गोळा करत आहेत. हा सेवाभाव करणाऱ्या गटाचे सदस्य सुनील नारवाणी म्हणाले, आम्ही दर दुसऱ्या दिवशी जवळपास २५ हजार रुपयांचे सुटे घेऊन रुग्णालयात जातो. त्यातून ४०-४५ जणांची मदत होते.

संदीप म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून गरजूंना मदत करत आहे. नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयात गेलो तेव्हा सुटे नसलेल्या १०० जणांची गर्दी दिसली. यात बहुतांश परराज्यातील लोकांचा समावेश होता. त्या दिवशी एका सहकाऱ्याच्या मदतीने ६ हजार रुपये ५०- १०० च्या नोटांच्या रुपात वाटले. मात्र, ही समस्या संपली नाही. त्यामुळे त्या दिवशी सुनील, रवी, मनीष व विशाल सचदेव यांच्यासोबत बाजारपेठेत सामान्य स्थिती होईपर्यंत काम करण्याचे ठरले. ‘भास्कर’ने रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली तेव्हा १४ रुग्णांचे नातेवाईक लोकांच्या घरातून पैसे बदलत असल्याचे दिसले. झारखंडच्या बोकारोचे रहिवासी राजेंदर सिंह यांनी ८ महिन्यांच्या नातीला उपचारासाठी येथे आणले. ते म्हणाले, १२ नोव्हेंबरपासून येथे आहे. जवळपास एकही एटीएम नाही. दोन तास रांगेत होतो. मात्र, नंबर येण्याआधीच पैसे संपले. यानंतर या सद्््गृहस्थांनीच मदत केली. त्यांच्याकडून तिसऱ्यांदा पैसे बदलत आहे.
बातम्या आणखी आहेत...