आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणात दोन लक्झरी गाड्यांमधून 2.22 कोटींच्या नोटा जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होडल/पलवल (हरियाणा) - दोन लक्झरी गाड्यांमधून २ कोटी २२ लाख ७६ हजार रुपयांच्या १००० व ५०० च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नोटा प्लास्टिकच्या चार मोठ्या पिशव्यांत भरण्यात आल्या होत्या. काही तरुण ही रक्कम लखनऊहून दिल्लीला घेऊन चालले होते. या दोन्ही गाड्या फरिदाबाद आरटीओमध्ये ओमेक्स कंपनीच्या नावे नोंदलेल्या आहेत. हरियाणातील पलवल पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली. दोघेही चालक आहेत, तर यांना घेऊन चाललेल्या पोलिसांना पाहून गाड्यातून उड्या टाकून पळून गेले.
डीएसपी होडल मौजीराम यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या टीमने रात्री एनएच-२ येथील उझिना ड्रेनवर नाकेबंदी केली होती. रात्री अडीच वाजता नाकेबंदीच्या थोडे अलीकडेच फार्च्युनर आणि क्रेटा गाड्या थांबल्या. यातून पाच-सहा तरुण उतरून शेताच्या दिशेने पळून जात होते. पोलिस तिकडे धावतच गाड्यांजवळ पोहोचले. पोलिसांनी चालकांना ताब्यात घेतले. त्यांनी अापण केवळ चालक असून या पिशव्यांत काय दडले आहे? याची कल्पना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची सूचना दिली.
बातम्या आणखी आहेत...