आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Custodian Of Maharana Pratap\'s Mewar Dynasty, Rana Sriji Arvind Singh

हे आहेत महाराणा प्रताप यांचे वंशज, विंटेज कार खरेदीचा आहे छंद! पाहा PHOTOS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विटेंज कारसमवेत अरविंद सिंह - Divya Marathi
विटेंज कारसमवेत अरविंद सिंह
जयपुर- 29 जानेवारीला महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी असते. त्यांचे वंशज आजही राजस्थान राहतात. अरविंद सिंह मेवाड नावाच्या या वंशजाने विदेशात शिक्षण घेतले आहे तसेच त्यांना महागड्या कार गाड्यांचा शौक आहे.
जानून घ्या, मेवाड घराण्यातील 76 व्या वंशजाबाबत...
उदयपुर राजघराण्याचे सदस्य अरविंद सिंह मेवाड हे या घराण्याचे 76 वे वंशज आहेत. त्यांचे पिता भगवत सिंह यांनी 1955 ते 1984 पर्यंत मेवाड घराण्याची कमान संभाळली. अरविंद सिंह यांचे सुरुवातीचे शिक्षण मेयो कॉलेजमध्ये झाले. यानंतर हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेण्यासाठी ते इंग्लडला गेले.
या दरम्यान त्यांनी शिकागो आणि यूकेमध्ये नोकरी केली. त्यांचा विवाह कच्छची राजकुमारी विजयाराज यांच्यासमवेत झाला. आता ते एचआरएच ग्रुप ऑफ होटल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ही संस्था त्यांच्या वडिलांनी स्थापन केली आहे.
विंटेज कारचे आहेत शौकीन
विंटेज कारचे शौकीन असलेले अरविंद सिंह यांच्याजवळ अनेक रोल्स रॉईस गाड्या आहेत. या सर्व गाड्या मेवाड राजघराण्याची निशाणी समजली जाते. त्यांच्याजवळ एक एमजी टीसी, 1939 कॅडिलेक कन्वर्टेबल आणि मर्सिडीजची काही मॉडेल्स आहेत. ते अनेक नव्या गाड्यांच्या लॉन्चिंग कार्यक्रमात जातात. असे सांगितले जाते की, अनेक गाड्या तर खास मेवाडचा राजांसाठी डिझाईन केल्या जातात, बनविल्या जातात. लग्झरी गाड्या सामान्य लोकांना पाहता याव्यात यासाठी राज्यघराण्याकडून खास व्यवस्था केली गेली आहे.
पुडे स्लाईड्समध्ये पाहा कोणत्या कोणत्या गाड्या आहेत अरविंद सिंह यांच्याजवळ...