आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवर शेअर केले ATM कार्डचे डिटेल्स, असा बसला फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर (उत्तर प्रदेश)- मोबाईलवर कॉल आला. मी बॅंकेतून बोलतोय असे समोरचा सांगत होता. त्याने एटीएम कार्डचे डिटेल्स मागितले. त्याच्या बोलण्यावरुन तो फ्रॉड असावा असे ग्राहकाला वाटले नाही. ग्राहकाने डिटेल्स शेअर केले. त्यानंतर या ग्राहकाला तब्बल 75 हजार रुपयांचा फटका बसला. यात बॅंकेची काही चुक नाही, असे बॅंकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
 
असे विचारले डिटेल्स
- अनुप असे या ग्राहकाचे नाव आहे. युनियन बॅंकेत त्याचे आणि पत्नीचे जॉईंट अकाऊंट आहे.
- 31 डिसेंबर रोजी दुपारी 7324907709 या मोबाईल क्रमांकाहून अनुपला फोन आला.
- त्याने सांगितले, की मी युनियन बॅंकेतून बोलतोय. तुम्ही आधारकार्ड जमा केलेले नाही. तुमचे अकाऊंट मला बंद करावे लागेल.
- कार्ड पुन्हा सुरु करण्यासाठी कार्डचा 16 डिजिट क्रमांक आणि आधार नंबर सांगा.
- अनुपने दोन्ही क्रमांका शेअर केले. त्याला सांगितले. त्यानंतर त्याने सांगितले, की मोबाईल क्रमांकावर बॅंकेकडून येणारा एसएमएस गोपनिय असतो. कुणाला सांगू नका.
- पुढील तीन दिवसांत तुमचे एटीएम सुरु होईल असे फोन करणाऱ्याने सांगितले.
 
तीन दिवसांत काढले 75 हजार
- अनुप यांनी याची माहिती पत्नीलाही दिली नाही. तसेच बॅंकेत जाऊनही याची चौकशी केली नाही.
- 4 जानेवारीला एक मेसेज आला. त्यात लिहिले होते, की 75 हजार रुपये काढण्यात आले आहेत.
- मेसेज वाचल्यावर अनुपची झोपच उडाली. त्यांनी बॅंकेत धाव घेतली.
- अनुप यांच्या अकाऊंटवरुन 3 जानेवारीला 25 हजार, 4 जानेवारीला 10 हजार, त्यानंतर पाच-पाच हजार वारंवार काढण्यात आले होते.
 
बॅंकेने जबाबदारी टाळली
- आम्ही अनुप यांना फोन केलेला नव्हता. आमच्या कॉल सेंटरवरुन अनुप यांना फोन गेला नव्हता.
- अनुप यांना कार्डचे डिटेल्स शेअर करायला नको होते. त्यांची चुक आहे.
- यात आम्ही काही करु शकत नाही, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.
 
पुढील स्लाईडवर बघा, अनुप यांचे बॅंक स्टेटमेंट... त्यांनी दिलेली तक्रार....
बातम्या आणखी आहेत...