आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉग शोमध्ये 22 लाखांचा कुत्रा, काही होते गोंडस तर काही भयावह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मालकासाठी जीव देण्यासाठी आणि घेण्यासाठी तयार असणा-या रॉट वायलरपासून निळ्या जिभेचा चायनिज डॉग चाऊ चाऊपर्यंत अनेक कुत्री काल अमरूदों बाग येथे घेण्यात आलेल्या 11 व्या डॉग शोचे आकर्षण ठरत होते. रविवारी झालेल्या या डॉग शोमध्ये शंभर पेक्षाही जास्त जातींची कुत्री पाहायला मिळाली. या डॉग चॅम्पियनशिपचे परिक्षक के. एस. नागराज शेट्टी होते. स्पर्धेचे निकष अ‍ॅनॉटॉमी, पॅरेंटींग आणि ट्रेनिंग हे होते. या पैकी बरेचशी कुत्री परिवारासमवेत सहभागी झाली होती. या शोमध्ये सगळीकडे हास्याचे फवारे उडत होते. रॅम्प शोची थिमही सामाजिक प्रश्नांवर आधारित होती.


22 लाखांचा बोरजोई

रशियाच्या राज्याला आवडणारा बोरजोई जातीचा कुत्राही या शोमध्ये पाहायला मिळाला. या कुत्र्याची किंमत 22 लाख असून तो रशियावरून आयात केल्याचे या कुत्र्याचा मालक उत्कर्ष राठोडने सांगितले. थंड वातावरणाची सवय असल्याने हा कुत्रा शोदरम्यान जास्त वेळ कारमध्येच होता.

या शोमध्ये 120 किलो वजन असणारा इंग्लिश मॅसटिफ हा सर्वात मोठा तर 700 ग्रॅम वजन असणारा यार्कशायर सर्वात लहान कुत्रा ठरला. या शोची प्रमुख पाहूणी दिया कुमारी होती. लहान मुले मोठ्या संख्येने या शोला आले होते, असे आयोजक विरेन शर्मांनी सांगितले. कुत्र्यांच्या जातींबरोबरच त्यांची नावेही मजेशीर होती. यात पेप्सी, डेजी, रूबल ही कॉमन नावे होती. या शोमध्ये हारवलेले कुत्रे दत्तक घेण्यात लोकांनी पुढाकार घेतला.

आरपीएफ डॉग स्क्यावार्डच्या आश्चर्यकारक करामतीला तर सर्व लोक पाहतच राहिले. पपी जोन हा कुत्रा लहान मुलांचे आकर्षण ठरला. याच बरोबर फ्रॅंडली पगलाही चांगली पसंती मिळाली. या शोमध्ये ग्रुमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. जयपुर महानगरपालिकेतर्फे या शोमध्ये लाइसन्स आणि रेजिस्ट्रेशन कॅम्पही घेण्यात आला.


पुढील स्लाइडवर पाहा विविध जातींच्या कुत्र्यांचे फोटो...