आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyclone Hudhud: PM Narendra Modi To Go On An Aerial Survey Today

‘हुदहुद’ वादळामुळे आंध्रप्रदेशमध्‍ये 8000 कोटींचे नुकसान, 1 हजार कोटीचे पॅकेज जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-विशाखापट्टनममध्‍ये पेट्रोल भरण्‍यासाठी लागलेल्‍या रांगा)
नवी दिल्ली/विशाखापट्‌टनम्- बंगालच्‍या खाडीवरून उठलेल्‍या ‘हुदहुद’ चक्रीवादळाने विशाखापट्टनम् किना-यालगतच्‍या क्षेत्रात कोट्यवधीचे नुकसान झाले. राज्‍याला या संकटातून वाचवण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.
मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी विशाखापट्टनमला भेट दिली. यावेळी वादळामध्‍ये मृत पावलेल्‍या लोकांच्‍या परिवाराला त्‍यांनी दोन लाख रुपये, जखमी लोकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. नैसर्गिक संकटात आम्ही नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत, असेही मोदी म्‍हणाले.
24 जणांचा मृत्‍यू
वादळामुळे आतापर्यंत 24 नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यामधील 21 लोक आंध्र प्रदेशमधील आहेत. ‘हुदहुद’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशमध्‍ये अंदाजे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशाखापट्टनममध्‍ये 70 इमारती कोसळल्‍या आहेत. आंध्रप्रदेशमध्‍ये 9 रेल्‍वे पटरी आणि दीडशेहून अधिक मोबाइल टॉवर निखळले आहेत. संदेश आणि दळणवळण सुविधा कायमची ठप्‍प झाली आहे.
महागाईचा भस्‍मासूर
चक्रीवादळाने हैराण झालेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काळाबाजार जोरात असून पाणी आणि दूध चढ्या दराने विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. एक लिटर पाणी 50 रुपये देऊन विकत घेण्याची वेळ आली आहे. तर दुध 60 ते 80 रुपये लिटरने घ्‍यावे लागत आहे. त्याचबरोबर केरोसीन, साखर, डाळ, बटाटे, कांदे, पाम तेल इत्यादी पदार्थ अचानक महाग झाले आहेत.
नाही मिळत एक लिटरहून अधिक पेट्रोल
पेट्रोल पंप एका व्‍यक्‍तीला एकच लिटर पेट्रोल देत आहे. एका नागरिकाने सांगितले की, दुकानदार मनमानी करत असून जीवनावश्‍यक वस्‍तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत.
अधिका-यांना अटकेचा आदेश
‘टेलिकॉम कंपनीचे अधिकारी आपली सेवा देण्‍यास असमर्थ ठरत असतील तर त्‍यांना पकडून माझ्या समोर हजर करा’, असा आदेशच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पोलिसांना दिला आहे. नायडू सोमवारी विशाखापट्टनमचा दौरा करत होते.
हवामानखात्‍याच्‍या सतर्कतेमुळे कमी झाले नुकसान
भारतीय हवामान खात्‍याने वादळाची अचूक कल्‍पना दिल्‍याने नुकसान कमी प्रमाणात झाले. प्रशासनालाही बचाव कार्य करण्‍यासाठी मदत झाली. या वादळाबद्दल ‘नासा’चे अनुमानही चूक ठरले. नासाने 10 ऑक्टोबरला सांगितले होते की, चक्रीवादळ 185 किमी प्रती तास असणार आहे. तर भारतीय हवामान खात्‍याने 6 ऑक्‍टोबर रोजी सांगितले होते की, चक्रीवादी 12 ऑक्‍टोबरला विशाखापट्टनमला धडकेल आणि त्‍याची गती 195 किमी प्रती तास असणार आहे. भारतीय हवामान खात्‍याचा अंदाज अचूक ठरला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, विशाखापट्टनम येथे झालेल्‍या विध्‍वंसाचे छायाचित्रे....