आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyclone Phailin May Create Huge Damage In Odisha And Andhra Pradesh

\'फालीन\' बनले महाचक्रीवादळ; ओडीशात सैन्‍याची पथके रवाना, वायुसेनाही सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्‍वर/नवी दिल्‍ली- बंगालच्‍या उपसागरावर घोंगावणारे 'फालीन' चक्रीवादळ तीव्र झाले असून एका महाचक्रीवादळात त्‍याचे रुपांतर झाले आहे. याचा परिणाम ओडीशा आणि आंध्र प्रदेशच्‍या किनारपट्टीवर दिसू लागला आहे. किनारपट्टीवर जोराने लाटा येऊ लागल्‍या आहेत. तसेच ताशी 100 किमीपेक्षा जास्‍त वेगाने वारे वाहू लागले आहेत. जसजसे 'फा‍लीन' किनारपट्टीजवळ येईल, तसा वा-यांचा जोर वाढणार आहे. ताशी 200 ते 260 किमीपर्यंत वा-याचा वेग वाढू शकतो.

चक्रीवादळ पुढील 24 तासांमध्‍ये आणखी तीव्र होऊ शकते. संभाव्‍य परिस्थितीचा अंदाज घेऊन ओडीशा सरकारने सैन्‍याची मदत मागितली आहे. ओडीशा आणि आंध्र प्रदेशमध्‍ये 'एनडीआरएफ'ची पथके आधीच तैनात करण्‍यात आली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संरक्षण मंत्री ए. के. एंटोनी यांनी सैन्‍याला ओडीशामध्‍ये कूच करण्‍याचे आदेश दिले आहेत. थलसेनेची दोन पथके ओडीशा आणि किनारपट्टीच्‍या भागाकडे रवाना होणार आहेत. तसेच वायुसेनेने 18 हेलिकॉप्‍टर्स आणि इतर आवश्‍यक सामग्री पाठविण्‍याचा निर्णय घेतली आहे. आपात्‍कालीन पथक आणि सैन्‍य कोणत्‍याही परिस्थितीचा सामना करण्‍यासाठी सज्‍ज ठेवण्‍यात आली आहे.