आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांनंतर चेन्नईत सर्वात वेगवान चक्रीवादळ, रेल्वे- विमानसेवा खंडीत, अतिदक्षतेचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - ‘वरदा’ चक्रीवादळ सोमवारी दुपारी अडीच वाजता चेन्नई व उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवरील जिल्ह्यांत धडकले. ताशी १२० किमी वाऱ्याचा वेग होता. ५० वर्षांतील हे चेन्नईतील सर्वात वेगवान चक्रीवादळ आहे. तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात सकाळपासूनच तुफान पाऊस झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. चक्रीवादळामुळे वेगवेगळ्या घटनांत १० लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. दुर्गम भागातील माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तिरुवल्लूवर व कांचीपुरमला या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. हे चक्रीवादळ बरेचसे कमकुवत पडले आहे. मंगळवारी ते कर्नाटकात पोहोचेल व गोव्यात संपुष्टात येईल.
श्रेणी-१ म्हणजे प्रचंड घातक आहे वरदा चक्रीवादळ
‘वरदा’ चक्रीवादळ श्रेणी-१ मध्ये ठेवण्यात आले आहे. चेन्नईत गेल्या ५० वर्षांत आलेले हे सर्वात वेगवान चक्रीवादळ आहे. यापूर्वी २८ नोव्हेंबर १९६६ रोजी श्रेणी-१ मधील शेवटचे चक्रीवादळ आले होते.१९९४ मध्ये श्रेणी-२ चे चक्रीवादळ चेन्नई किनाऱ्यावर धडकले होते.
महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता

तामिळनाडू व आंध्र प्रदेशबाहेरही अन्य राज्यांत वादळाचा परिणाम होईल?
वरदा गोव्यापर्यंत पोहोचेपर्यंत पूर्णपणे ओसरेल. महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

वरदा वादळाचे नाव काेणी ठेवले?
पाकिस्तानने ठेवले. याचा अर्थ लाल गुलाब. याआधीच्या वादळाचे नाव ओमानने ‘हुदहुद’ ठेवले होते. वादळाच्या ६४ नावांची यादी तयार.

वादळामुळे कोणते नुकसान तर नाही?
चक्रीवादळास समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्णता व बाष्पातून ऊर्जा मिळते. जमिनीवर आल्यानंतर ते कमकुवत होते. पावसाच्या काही घटना शक्य.
डी.पी. दुबे, हवामान तज्ज्ञ
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...