आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyclonic Storm Mahasen: Rain, Thundershower Likely In Odisha

महासेन वादळाने ओडिशात पाऊस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - महासेन चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडिशा किनारपट्टीसह इतर भागात आगामी चोवीस तासांत गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील आग्नेय क्षेत्राकडे महासेन वादळ सरकले आहे. वादळ किनारपट्टीपासून 760 किलो मीटर अंतरावर आहे. वादळ उत्तर दिशेने जात आहे. या काळात किनारपट्टीवरील अनेक शहरांतून वादळी वार्‍यासह पाऊस हजेरी लावू शकतो. परादिप बंदराच्या परिसरात हे वादळ आले आहे. त्यानंतर ते बांगलादेश-म्यानमारकडे जाऊ शकते, असा अंदाज ओडिशातील हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आगामी चोवीस तासांत राज्यातील काही भागातही पाऊस होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

श्रीलंकेला तडाखा, 7 ठार, 3000 बेघर
महासेनने मंगळवारी श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. त्यात 7 ठार तर 3 हजार लोक बेघर झाले आहेत. चक्रीवादळामुळे या भागात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे झालेल्या पडझडीत 7 जण ठार तर दोघे बेपत्ता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून सांगण्यात आले. बेघर झालेल्या 2800 लोकांसाठी चार ठिकाणी तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत.

किती आहे वेग ? : महासेन वादळाचा वेग ताशी 35 ते 40 किलोमीटर आहे. वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाल्यामुळे आग्नेय दिशेने वारे ताशी 50 किमी वेगाने वाहू लागले आहेत.