सिरोही - चंबलच्या खोऱ्यातील कुख्यात डाकू पंचम सिंहने ब्रह्माकुमारीजच्या राजयोगामुळे आयुष्याचा कायापालट केला. आता ते संतांप्रमाणे इतरांना शांततेचा, सलोख्याचा संदेश देत आहेत. 1970 मध्ये पंचम सिंह चंबलच्या खोऱ्यात कुख्यात डाकू राहिले. त्यांच्यावर 100 खून, 200 दरोड्यांचे गंभीर आरोप होते. सरकारने त्यांना पकडण्यासाठी 2 कोटींचे बक्षीसही जाहीर केले होते. नुकतेच मंगळवारी ते सिरोहीला आले, येथे त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
जेव्हा इंदिरा गांधींना दिली धमकी...
- त्यांनी 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहून सरकारने बनवणे आणि पाडण्याची धमकीही दिली होती.
- यामुळे चिडलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी चंबलच्या खोऱ्यात सैन्याचे हेलिकॉप्टर पाठवून डाकूंचा नायनाट करण्याची योजना बनवली होती, परंतु पंचम सिंहच्या नेतृत्वात सर्व डाकू शेतकरी बनून आसपासच्या गावांत गेले.
- यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण व्यास यांनी दूत बनून डाकूंना आत्मसमर्पण करण्याचा संदेश दिला.
- पंचम सिंह यांनी आठ मागण्या पूर्ण करण्याच्या अटीवर समर्पणाचा विश्वास दिला. मागण्या मान्य झाल्यावर पंचम सिंह यांनी मोड सिंहसह चंबलच्या खोऱ्यातील सर्व 556 डाकूंनी आत्मसमर्पण केले.
- परंतु, सरकारने पंचम सिंह मोड सिंहवर केस चालवली, यात कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
- तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण व्यास यांनी राष्ट्रपतींकडे त्यांची फाशी रद्द करण्यासाठी विनंती केली. ही मागणी राष्ट्रपतींनी मान्य केली. यानंतर त्यांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा झाली.
ब्रह्माकुमारीजच्या भगिनींनी बदलले आचरण
- पंचम सिंह म्हणाले की, खुल्या जेलमध्ये ब्रह्माकुमारीज संस्थानच्या बहिणींनी त्यांची वर्तणूक बदलली.
- परिणामी, 8 वर्षांतच त्यांना चांगल्या वर्तणुकीमुळे तुरुंगातून मुक्त करण्यात आले. तेव्हापासून ते तळागाळात शांततेचा, सलोख्याचा संदेश देण्याचे कार्य करत आहेत.
- मथुरेत त्यांचा आश्रम आहे. 96 वर्षीय पंचम सिंहांनी आतापर्यंत 27 राज्यांच्या 500 तुरुंगांत, 1 लाख शाळा तसेच 2 लाख गावांमध्ये सहज राजयोगाचा प्रचार-प्रसार केलेला आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, डाकूचे संत बनलेल्या पंचम सिंहांचे फोटोज...