आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार आणि लालू यादव एकाच मंचावर, दैनिक भास्करच्या पाटणा आवृत्तीचे लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - 'दैनिक भास्कर'च्या पाटणा आवृत्तीचा शुभारंभ आज (शनिवार) झाला आहे. चौदा राज्यांतील दैनिक भास्करची ही 67 वी आवृत्ती आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते विशेष अंकाचे लोकार्पण झाले आहे. विक्रमी प्रतींसह पाटणा आवृत्तीचा पहिला अंक रविवार, 19 जानेवारी 2014 ला प्रकाशित होईल.
दैनिक भास्करच्या लोकार्पण सोहळ्यात कट्टर राजकीय विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव एकाच मंचावर आले होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी भास्करच्या व्हिजनची माहिती दिली. ते म्हणाले, भास्कर वाचकांना केंद्रस्थानी ठेवून वृ्त्तपत्र प्रकाशित करीत असते. आमचे काम केवळ व्यवसाय वाढवणे नाही तर लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
बिहारमधील कट्टर राजकीय विरोधक एकाच मंचावर आल्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. लालू यादव यांनी जिल्हा आवृत्यांवर नाराजी व्यक्त करत वृत्तपत्रांमध्ये संपूर्ण राज्याच्या बातम्या असल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याच बरोबर सरकारी जाहिरातींसाठी सरकारच्या विरोधात आता लिहिले जात नाही असे सांगत सरकारच्या धोरणावर वृत्तपत्रांनी सडकून टीका केली पाहिजे, असे म्हटले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, सध्या सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असल्याचे सांगत लालू यादव यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. ते म्हणाले, आता जूने-जूने लोकही ट्विट करायला लागेल आहेत. (त्यांचा रोख लालू यादव यांच्याकडे होता.) ट्विटचा अर्थ होतो, चिव-चिवाट करणे. नव्या तरुणाईसोबत आता जून-जून लोकही चिव-चिवाट करायला लागले आहेत. (लालू यादव यांनी नुकतेच ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे)
नितीशकुमार म्हणाले, भास्करमध्ये काय छापून आले याची सरकारच्या वतीने कधीही विचारणा होणार नाही. मात्र भास्करने बिहारची प्रगती आणि या राज्याच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. बिहार - झारखंड यांची विभागणी होऊन 13 वर्षे झाली आहे. तेव्हा बिहारच्या जनतेला या घटनेबद्दल दुःख होत होते. मात्र, आता बिहारमध्ये विकास होत आहे, त्यामुळे लोकांमध्ये ती नाराजी राहिलेली नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लोकार्पण सोहळ्याची छायाचित्रे..