आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धमान ब्लास्ट: तरुणीच्या जाळ्यात अडकून इमाम-मौलवीचा झाला दहशतवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची / पाकूड - झारखंड पोलिसांच्या ताब्यात असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी मो. इब्राइम शेखने पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले. तो म्हणाला, मी एका तरुणीच्या जाळ्यात अडकलो आणि इमामचा मौलवी आणि मौलवीचा दहशतवादी झालो. पश्चिम बंगालमधील वर्धमान स्फोटा प्रकरणी इब्राहिम आरोपी आहे. शनिवारी सायंकाळी मालदा - वर्धमान पॅसेंजर रेल्वेने तो पाकूडला येणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिलभिटी स्टेशनवरच त्याला पकडले.
इब्राहिमने पोलिस चौकशीत मान्य केले, की तो एका मदरशात मौलवी म्हणून नोकरी करत होता. तिथेच एका बांगलादेशी तरुणीच्या - साजिदा हिच्या संपर्कात आल्यानंतर दहशतवादी संघटनांशी त्याचा संपर्क आला. दरम्यान, आज (सोमवार) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचा चौकशीसाठी पश्चिम बंगाल पोलिस आणि एनआयएची टीम देखील पाकूडला पोहोचली आहे.
मुलींच्या मदरशात होता इमाम
दहशतवादी इब्राहिमने मान्य केले आहे, की बंगालमधी नादिया जिल्ह्यातील मिर्झापूर मशिदीत तो इमाम होता. येथे तो कट्टरपंथी विचारांचा प्रचार-प्रसार करत होता. मात्र येथील गावकऱ्यांनी त्याच्या या शिकवणीला विरोध केला आणि त्याला तेथून हकलून लावले. त्यानतंर नोकरीच्या शोधात तो 2012 मध्ये मुकीमनगर येथील फातिमा तुल जोहरा बनात मदरशात आला. येथे त्याला मौलवीची नोकरी मिळाली. हा मदरसा फक्त मुलींसाठी चालवला जात होता. येथेच त्याची बांगलादेशी साजिदा नावाच्या युवतीशी ओळख झाली. तिने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले आणि बांगलादेशची दहशतवादी संघटना जेएमबीच्या विस्ताराची जबाबदारी त्याला दिली. तिने या संघटनेबद्दलची सर्व माहिती त्याला दिली होती. यानंतर त्याला मदरशाचा प्रमुख करण्यात आले.
मोबाइल फोनच्या मेमरी कार्डमधून मिळाले जिहादचे संदेश
मो. इब्राहिमकडे पोलिसांना एक मोबाइल आणि मेमरी कार्ड सापडले आहे. यात जिहादशी संबंधीत अनेक संदेश आहेत. त्याशिवाय पोलिसांना त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल, सहा रिव्हाल्व्हर, सहा काडतूस, चार देशी बॉम्ब आणि तीन हजार रुपये सापडले. मेमरी कार्डमध्ये लोकांना चिथावण्यासाठीचे व्हिडिओ आणि संदेश आढळले आहेत.
कोण आहे इब्राहिम शेख
मो. इब्राहिम शेख पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील रहिवासी आहे. बांगलादेशात बंदी घातलेल्या जमात उल मुजाहिदीन (जेएमबी) संघटनेचा तो भारताताली ट्रेनर आहे. त्यासोबतच तो जेएमबीची राजकीय समिती शूराचाही सदस्य आहे. तो बांगलादेश आणि आसमामधील संघटनेच्या म्होरक्यांच्या इशारावर काम करत होता. 2 ऑक्टोबर 2014 रोजी पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे बॉम्ब तयार करत असताना झालेल्या स्फोटात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. तर, एक गंभीर अवस्थेत पोलिसांना सापडला होता. पोलिसांच्या ताब्यात आलेल्या दहशतवाद्यांने सांगितले होते, की इब्राहिम मुर्शिदाबाद मधील मुकिमनगर येथील फातिमा तुल जोहरा बनात मदरशाचा प्रमुख आहे. येथेच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
फोटो - पोलिसांच्या ताब्यात मोस्ट वाँटेड दहशतवादी इब्राहिम
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इब्राहिमसह पोलिसांनी काय - काय ताब्यात घेतले