जयपूर- बदलत्या वर्षासोबत गुलाबी शहर जयपूरची हवा किती बदलली हे जाणून घेण्यासाठी भास्कर टिमने एक नविन प्रयोग राबवला. भास्कर टिमने लोकांसोबत प्रॅक्टिकल जोक्स केले. परंतू यातून जयपूरच्या नागरिकाचा आश्चर्यकारक प्रतिसाद दिसला.
कसा होता प्रतिसाद...
- बंगळूरुत नव्या वर्षाच्या उत्सवात महिलांशी गैरकृत्य झाल्याची घटना घडली.
- ही बाब लक्षात घेऊन भास्करने भररस्त्यावर मुलींना छेडण्याचा प्रयोग केला.
- भास्कर टिमच्या छेडणाऱ्या रिपोर्टला लोक रोखतील, समझावतील आणि नाही ऐकले तर पोलीसांच्या ताब्यात देतील अशी अपेक्षा होती.
- परंतू असे काहीच घडले नाही. जयपूर शांततेत हे सर्व पाहत होते.
- भररस्त्यावर तरुणीचा स्कार्प खेचणाऱ्या तरुणाला पाहुन कोणीच समोर आले नाही.
असा करण्यात आला प्रयोग
- नविन वर्षाच्या उत्सवात बंगळूरुत तरुणींसोबत झालेल्या गैरकृत्यावर सर्व बोलत आहेत.
- हे लक्षात घेऊन भास्कर टीमने गर्दीच्या ठिकाणांची निवड केली.
- एकाही ठिकाणी कोणीच छेडछाडीला रोखले नाही.
चेहरा पाहिला तरी कोणीच समोर आले नाही
स्थळ: रामबाग सर्कल, वेळ : सायंकाळी 6 वाजता
- रामबाग सर्कलवर टिमच्या एका तरुणीला उभे करण्यात आले.
- टीमचा एक तरुण स्कूटरवर आला आणि महिलेचा स्कार्प ओढून तीच्यासोबत छेडछाड केली.
- तिथे उभे असलेल्या 3-4 तरुणांनी भास्कर टिमच्या छेड काढणाऱ्या तरुणाला पाहिले, गाडी नंबरही पाहिला पण तक्रार करण्याची वेळ आली तर सर्व मागे हटले.
- गाडी नंबर दिसला नाही, साक्ष देणार नाही असे त्यांनी सांगितले.
येथे पोलीस स्वत: सक्रिय झाले
स्थळ: गांधीनगर चौक, वेळ : सायंकाळी 6:20 वाजता
- गांधीनगर चौकात टिमने पीसीआर समोरील जागा निवडली.
- येथे टिमच्या तरुणीला रस्त्यावरुन जाताना टिमच्या रिपोर्टरने छेडले.
- तिथे उभे असलेले लोक शांत होते, पण पोलीसाने पाठलाग करुन रिपोर्टला पकडले.
असेच प्रयोग भास्करच्या टिमने चार ठिकाणी केले. परंतू त्यावर जयपूरच्या नागरिकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही आणि त्याला विरोधही केला नाही.
पुढिल स्लाइडवर पहा घटनेचे PHOTOS......