आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalai Lama Said Bihar Showed That India Need Peace

दलाई लामा म्हणाले, हिंदुंचा शांततेवरील विश्वास बिहारमध्ये झाला सिद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : दलाई लामा

जालंधर - तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी बिहारच्या निवडणुकीच्या निकालांचा उल्लेख करत म्हटले की, आजही बहुतांश हिंदुचा शांतता आणि मैत्रीवर विश्वास आहे. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. दलाई लामांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार सुब्रमण्यम म्हणाले की, दलाई लामांचे वक्तव्य हे विनाकारण केलेले होते. त्यांना या प्रकरणाची फारशी माहिती नाही.

क्या म्हणाले दलाई लामा...
जालंधरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दलाई लामा म्हणाले की, भारतात शांतता आणि मैत्रीची मोठी परंपरा आहे. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीत ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हिंदू समुदायाचे बहुतांश लोक अजूनही शांतता आणि मैत्रीवर विश्वास ठेवतात.

टॉलरन्सबाबत...
टॉलरन्स बाबत दलाई लामा म्हणाले की, भारत एक असा देश आहे, ज्याठिकाणी सर्व धर्मांना समान अधिकार दिले जातात. त्याचमुळे जगामध्ये भारताची ओळख धार्मिक दृष्ट्या एक सहिष्णु देश अशी आहे. भारताला पुढाकार घेऊन धार्मिक टॉलरन्सच्या मुद्यावर जगाचे नेतृत्व करायला हवे.