आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Minor Girl Rape Killed Accused Remove Eyes Hardoi

UP: अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, ओळखू नये म्हणून काढले डोळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी दाखल झालेले पोलिस - Divya Marathi
घटनास्थळी दाखल झालेले पोलिस
हरदोई (उत्तर प्रदेश) - हरदोई जिल्ह्यात 13 वर्षांच्या दलित मुलीवर सामुहिक बलात्कारानंतर तिचे डोळे काढून नंतर निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांना शंका आहे, की आरोपींनी मुलीने आपल्याला ओळखू नये यासाठी तिचे डोळे काढले, मात्र जेव्हा प्रकरण अंगाशी येत आहे असे लक्षात आले तेव्हा त्यांनी अल्पवयीन मुलीलाच संपवले. पोलिसांनी अज्ञातांविरोधात बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हरदोई जिल्ह्यातील सुरसा पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या फातियापूरमधील मजरा लुकताना गावातील ही घटना आहे. बुधवारी सायंकाळी अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. मुलगी वडीलांची औषधी आणण्यासाठी बाहेर गेली होती, चुकीने ती औषधी विसरुन आली आणि औषधी घेण्यासाठी परत बाहेर गेली तेव्हा तिच्यावर हा प्रसंग ओढवला. मुलीला घरी येण्यास उशिर झाला यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला तेव्हा एका शेतात तिचा मृतदेह सापडला. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. चेहरा मात्र ओढणीने झाकलेला होता. चाकूने अनेक वार करुन चेहरा विद्रूप केलेला होता. डोळे काढण्यात आलेले होते. गुप्तांगावरही चाकूचे वार होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे