आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित विद्यार्थ्याची आत्महत्या,केंद्रीय राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्यावर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित वेमलू (फाइल फोटो) - Divya Marathi
रोहित वेमलू (फाइल फोटो)
हैदराबाद - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठामधील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी केंद्रीय श्रम मंत्री आणि विद्यापीठाच्या कुलगुरुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री रोहित वेमलू या दलित स्कॉलर्सने वसतीगृहात गळफास घेतला होता. सोमवारी सकाळपासून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत विद्यीपीठ प्रशासन आणि बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली होती.
आत्महत्या केलेला रोहित वेमलु गुंटूर येथील रहिवासी होता. गेल्या आठवड्यात विद्यापीठाने वसतीगृहातील पाच विद्यार्थ्यांना निलंबित केले होते, त्यापैकी एक रोहित होता. रोहित विद्यापीठात पीएचडी करत होता. 25 वर्षांच्या रोहितने रविवारी हॉस्टेलमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली.
UPDATES
- रोहित वेमलुच्या निधनानंतर विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थी संघटना एकवटल्या आहेत.
- पोलिसांना घटनास्थळी पाच पानांची सुसाइड नोट सापडली आहे.
- विद्यापीठ परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
- आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा आरोप आहे, की केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बंडारु दत्तात्रय यांच्या सांगण्यावरुनच दलित स्कॉलर्सवर कारवाईसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पत्र लिहिले होते.
- विद्यार्थ्यांनी बंडारु दत्तात्रय यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पाठवली टीम
विद्यार्थ्याच्या आत्महत्या आणि केंद्रीय श्रम मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्यानतंर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी एक पथक हैदराबादला पाठवले आहे.
हे पथक विद्यापीठात जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे.
वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालयात घातली होती बंदी
अशी माहिती आहे, की रोहित वेमलु हा आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्याच्यासह चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. या पाच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 10 विद्यार्थी संघटनांनी उपोषण करत त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. या संघटनांचे म्हणणे होते, की सर्व विद्यार्थी सामाजिक बहिष्काराचे शिकार आहेत.
रोहितसह चार विद्यार्थ्यांना विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालय यासह अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती. त्यानंतर ते उघड्यावर राहात होते.

रोहितच्या आत्महत्येनंतर तेलंगणाच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी आज बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थींनीही रोहितच्या आत्महत्येचा निषेध केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, रोहित वेमलुचे अखेरचे पत्र