आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षिता FB liveवर द्यायची शिव्‍या; म्‍हणायची, हे लोक करतात लैगिंक शोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणाची सिंगर आणि डान्‍सर हर्षिता दहिया. - Divya Marathi
हरियाणाची सिंगर आणि डान्‍सर हर्षिता दहिया.
पाणिपत- पाणिपतच्‍या इसरानामध्‍ये हरियाणाची सिंगर आणि डान्‍सर हर्षिता दहिया हिची मंगळवारी गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली. हर्षिताला 4 गोळ्या घालून हल्‍लेखोर फरार झाले आहेत. पोलिस त्‍यांचा शोध घेत आहेत. हर्षिता आपल्‍या मित्रांसोबत प्रवास करत असतानाच ही घटना घडली. हत्‍येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत्यूच्या काही तास आधीच हर्षिताने धमकी मिळाल्याचे फेसबुकवर म्हटले होते. हर्षिता फक्‍त तिच्‍या डान्‍स आणि गाण्‍यासाठीच फेमस होती असे नव्‍हे तर ती फेसबूक लाईव्‍हवर बिनधास्‍त बोलायची व शिव्‍याही द्यायची. 

यामुळे आली चर्चेत 
- हर्षिता तेव्‍हा चर्चेत आली जेव्‍हा अल्‍बम बनवणा-या एका कंपनीविरोधात तिने कलाकारांना एकत्र करणे सुरु केले.  
- त्‍यानंतर फेसबूकद्वारे तिने या कंपन्‍यांविरोधात मोर्चाच उघडला होता. तिने या कंपन्‍यांवर आरोप केला होता की, या कंपन्‍या कलाकारांकडून भरपूर काम तर करुन घेतात मात्र त्‍याचा मोबदला ते कलाकारांना देत नाहीत. 
- तिचे म्‍हणणे होते की, कलाकार आपले हक्‍काचे पैसे मिळवण्‍यासाठी कंपनीच्‍या मालकांकडे चकरा मारत राहतात. मात्र त्‍यांना पैसे मिळत नाही. त्‍यामुळे सर्व कलाकारांनी या कंपन्‍यांविरोधात एकत्र आले पाहिजे. 

लैगिंक शोषणाचा आरोप  
- हर्षिताने कंपनी मालकांविरोधात कलाकारांना फक्‍त पैसे न देण्‍याचाच आरोप केला नव्‍हता. तर सोशल मिडीयावर अपलोड केलेल्‍या व्हिडिओमध्‍ये तिने हेही म्‍हटले होते की,'कित्‍येक कंपनीचे संचालक नवख्‍या मुलींना काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने फसवतात आणि त्‍यांचे लैगिंक शोषणही करतात.' 
- हर्षिताने पुढे म्‍हटले होते की, यातील बहुतांश मुली या गरीब असतात. त्‍यामुळे आपण फसलो याची जाणिव त्‍यांना होते तेव्‍हा ते याविरोधात आवाजही उठवू शकत नाही. आणि तसा प्रयत्‍न केलाच तर त्‍यांना भिती दाखवून गप्‍प बसवले जाते.' 

दोन दिवसांपूर्वीच केला होता कार्यक्रम 
- हर्षिताची कंपन्‍यांविरोधातील मोहिम एवढी व्‍यापक झाली होती की, स्‍वत: तिनेच आपल्‍याला जिवे मारण्‍याच्‍या धमक्‍या मिळत आहे, असा खुलासा केला होता. 
- हर्षिता आणि तिच्‍यासोबतच्‍या काही कलाकारांनी कंपन्‍यांविरोधात सोनीपतमध्‍ये मागील रविवारीच एक मोठा कार्यक्रमही केला होता. 
- या कार्यक्रमात हर्षिताने कंपन्‍यांच्‍या संचालकांना खुले आव्‍हान दिले होते. त्‍यांनतर मंगळवारीच गोळ्या घालून तिची हत्‍या करण्‍यात आली. त्‍यामुळे पोलिस या दिशेनेही तपास करत आहेत. 

भांडणाचा व्‍हॉट्सअप स्‍क्रीन केला शेअर 
- काही दिवसांपूर्वीच हर्षिताचे एका महिलेसोबत जोराचे भांडण झाले हाते. त्‍यावेळच्‍या भांडणाचा व्हिडिओ हर्षिताने शेअर केला आहे. 
- इतकेच नव्‍हे तर या महिलेसोबत नंतर व्‍हॉट्सअपवरही तिचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे व्‍हॉट्सअप स्‍क्रीनही तिने नंतर फेसबुकवर शेअर केले. यामध्‍ये अत्‍यंत गलिच्‍छ शब्‍दांत त्‍यांनी एकमेकांना शिव्‍या दिल्‍या आहेत. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...