आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षिता 10वीत असताना भावजीनेच केला होता रेप, खुद्द बहिणीनेच केलाय दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत (हरियाण) - डान्सर-सिंगर हर्षिता दहियाची मोठी बहीण लताने तिच्या पतीवर हर्षिताचा खून केल्याचा आरोप केला आहे. तो बलात्काराच्या आरोपात तिहार तुरुंगात कैदेत आहे. लता म्हणाल्या की, त्यांचा पती राजकुमारचा 6 वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. यानंतर हर्षिता लताजवळ दिल्लीच्या कराला गावात राहायला लागली होती. हर्षिता 10वीत होती तेव्हा तिचा भावजी दिनेशने शाळेतून तिला उचलून आणून तिच्यावर रेप केला होता.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- हर्षिताची आई प्रेमोने दिनेशवर केस दाखल केली आहे. दिनेशने दबाव टाकल्यावरही प्रेमोने होकार दिला नाही.
- 2014 मध्ये दिनेशने प्रेमोची गोळी झाडून हत्या केली होती. हर्षिता आईच्या खुनाची साक्षीदार होती.
- लताचा आरोप आहे की, दिनेशनेच तुरुंगातून हर्षिताच्या हत्येचा कट रचला.
- डीएसपी क्राइम देशराज यांचेही म्हणणे आहे की, दिनेश हर्षितला सातत्याने खुनाची धमकी देत होता. त्याच्यावरच खुनाचा संशय आहे. त्याचीही चौकशी केली जाणार आहे.
 
कशी झाली होती डान्सर हर्षिताची हत्या? 
- हर्षिता दहिया सोनिपतच्या मोहम्मदपूर गावातील रहिवासी होती. सध्या ती तिच्या मावशीसोबत दिल्लीत राहत होती. हर्षिताच्या आईवडिलांचे निधन पूर्वीच झालेले आहे. हर्षिता दोन बहिणी आहेत, त्यांची लग्ने झालेली आहेत.
- मागच्या दीड वर्षात डान्स आणि गायिका म्हणून हर्षिता प्रसिद्ध झाली होती. फेसबुक पेजवर ती आपले व्हिडिओही अपलोड करायची. मृत्यूआधीही धमकी मिळाल्याचे तिने फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटले होते.
 
हल्लेखोरांनी हर्षिताची कार ओव्हरटेक केली होती
- मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता हर्षिता एका कार्यक्रमावरून परतत होती. तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. तिच्यासोबत संदीप आणि निशा हे मित्रही होते.
- सोनिपतच्या रस्त्यात एका कारने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले आणि मग हर्षिताची गाडी अडवली. कारमधून दोन जण बाहेर आले. त्यांनी हर्षिताच्या मित्रांना पळून जायला सांगितले. यानंतर जवळून हर्षितावर 4 गोळ्या झाडल्या.
- प्रकरणाची माहिती मिळताच एसपी राहुल शर्मा, डीएसपी क्राइम देशराज आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. सध्या, हत्येचे कारण समोर आलेले नाही. हर्षिताने फेसबुक व्हिडिओत म्हटले होते की, मी धमक्यांना भीक घालत नाही. परंतु तिचा खून करण्यात आला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज
बातम्या आणखी आहेत...