आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी \'दंगल\' : एका महिन्यात लिहिले उर्दू नाटक, सगळे शो होताहेत हाऊसफुल्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाटकाचे पोस्टरही आमीरच्या चित्रपटाच्या पोस्टरसारखेच आहे. - Divya Marathi
नाटकाचे पोस्टरही आमीरच्या चित्रपटाच्या पोस्टरसारखेच आहे.
चंदिगड - बॉलीवूडचे चित्रपट एक तर हॉलीवूड किंवा टॉलीवूडची कॉपी असतात. पाकिस्तानातही अशा प्रकारच्या खटपटी होतात. त्यांच्याकडे बॉलीवूडचे गाजलेल्या चित्रपटाचे नाट्यरूपांतर केले जाते. याचे ताजे उदाहरण म्हणून “दंगल’ या आमिर खानच्या चित्रपटाचे देता येईल.
 
पाक कलावंतांवर बंदी आणि पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी यामुळे तेथे आमिर खानचा सुपरहिट चित्रपट “दंगल’ प्रदर्शित होऊ शकला नाही.  या चित्रपटाविषयी पाकिस्तानी नागरिकांचे असलेले आकर्षण लक्षात घेता, लाहोरच्या नाटककारांनी एक महिन्याहूनही कमी काळात “दंगल’च्या स्क्रिप्टवर त्याच नावाचे नाटक लिहिले आहे. याचे प्रयोग सुरू असून सर्व प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत.  
 
लाहोरमध्ये नाटकांची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणावर अाहे. “दंगल’ नाटकात महावीरसिंग फोगट यांची भूमिका पाकिस्तानी कलावंत नसीम विकी यांनी साकारली आहे. त्यांनी अामिर खानच्या लूकची कॉपी केली आहे. आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू बनवतात.
 
नसीम यांनी चित्रपटाची पटकथा उर्दूत लिहिली आहे. साबिया खान यांनी फोगटच्या पत्नीची आणि सिदरा नूर, महक नूर, निशा भट्टी आणि निगार चौधरी यांनी त्यांच्या चार मुलींची भूमिका साकारली आहे. नाटकाची रंगीत तालीम करताना  कुस्तीचे प्रशिक्षक म्हणून  प्रशिक्षण देताना त्यांच्या पित्याची भूमिका खूप त्रासदायक ठरली. कारण या मुलींना अनेकदा मार लागला. बॉलीवूडमधील पीके, देवदास आणि तेरे नाम या चित्रपटांवर लाहोरमध्ये नाटके बनलेली आहेत. 
 
पुन्हा रंगभूमीकडे प्रेक्षक  
नाटकाचे निर्माता सिकंदर बट्ट यांनी सांगितले, कुस्तीचे सामने दाखवण्याची खूप तयारी केली आहे.  दृश्य बदलण्यासाठी ते तीन भागात दाखवण्यात आले आहे. लाहोरमध्ये कुस्तीशौकिनांची संख्या जास्त आहे. रंगभूमीवरील सर्व प्रयोग हाऊसफुल्ल ठरल्यामुळे या प्रयोगाचे यश लक्षात घेण्याजोगे ठरते.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...