आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Darul Uloom Deoband Says, Bharat Mata Ki Jay Slogan Against Islam

दारूल उलूम देवबंदच्या फतव्याला जमात- ए- इस्लामी हिंदने दिला पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- ‘भारतमाता की जय’ ही घोषणा इस्लामविरोधी असून ती देऊ नये, या दारूल उलूम देवबंदच्या फतव्याला जमात- ए- इस्लामी हिंदने पाठिंबा दिला आहे. या घोषणेचा देशभक्तीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे ‘जमात’चे अध्यक्ष इस्लामी विद्वान मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी म्हणाले. देवबंदचा फतवा योग्य आहे. ‘भारत की जय’ ही घोषणा सर्वांसाठी स्वीकारार्ह आहे. कोणाचाही वाद नाही. समाजाचे ध्रुवीकरण करून देशाची अखंडता एकता धोक्यात आणण्यासाठी जातीयवादी फॅसिस्ट शक्ती देशभक्तीवर मुद्दाम वाद घालत आहेत, असे उमरी म्हणाले.
काय होता दारुल उलूम देवबंदचा फतवा
मुस्लिम समाजाने ही घोषणा देऊ नये, असा फतवा या संस्थेने काढला आहे. ही घोषणा म्हणजे एक प्रकारे मूर्तिपूजेला मान्यता देण्यासारखे आहे. हे इस्लामच्या तत्त्वांत बसत नाही, असे या संस्थेचे म्हणणे आहे.

या मुद्द्यावर आमच्याकडे प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या. म्हणून दारुल उलूमने "भारतमाता की जय' ही घोषणा देऊ नये असा फतवा काढला, असे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अश्रफ उस्मानी यांनी सांगितले. केवळ मानवच मानवाला जन्म देऊ शकतो, मग एखादा देश आपली माता कशी होऊ शकेल, असे ते म्हणाले.
पुढीस स्लाइड्सवर वाचा, कसा पेटला होता वाद, नंतर काय म्हणाले RSS प्रमुख मोहन भागवत