आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Darul Uloom Deoband Suggest Muslim Official To Quit Job If Beard Demand Rejected

दाढी ठेवता येत नसेल तर नोकरी सोडून द्या, दारुल उलूमचा इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्याला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्याने दारुल उलूम देवबंद मदरशाला प्रश्न विचारला होता. - Divya Marathi
इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्याने दारुल उलूम देवबंद मदरशाला प्रश्न विचारला होता.
सहारनपूर (उत्तर प्रदेश) - जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम मदरशांपैकी एक दारुल उलूम देवबंदने भारतीय हवाई दलातील एका अधिकाऱ्याला नोकरीच्या ठिकाणी दाढी राखू दिली जात नसेल तर इंडियन एअरफोर्स सोडण्याचा सल्ला दिला आहे किंवा जोपर्यंत नवी नोकरी मिळत नाही तोपर्यंत रोज शेव्ह करुन अल्लाहची माफी मागण्यास सांगितले आहे. या सल्ल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. दारुल उलूम देवबंदने अधिकाऱ्याला एखाद्या वकीलाची मदत घेण्याचाही सल्ला दिला आहे.
इंडियन एअरफोर्स (एआयएफ) अधिकाऱ्याने विचारले होते, मी काय करु, नोकरी सोडू की चालू ठेवू ?
- हे स्पष्ट केले पाहिजे, की दारुल उलूम देवबंदने स्वतःहून हवाई दलातील अधिकाऱ्याला सल्ला दिलेला नाही. अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर दारुल उलूमने काही पर्याय सुचविले आहेत. त्यातही नोकरी सोडण्याचा आग्रह धरलेला नाही.
- अधिकाऱ्याने विचारले होते, मी फार कमी वयात भारतीय हवाई दलात दाखल झालो होतो. तेव्हा मला दाढी नव्हती. आता माझ्या नोकरीला 10 वर्षे झाली आहेत.
- 'मला वाटते की या नोकरीमुळे मी माझ्या धर्माच्या अधिक जवळ आलो. कारण नोकरीच्या निमीत्ताने मी देशातील अनेक ठिकाणी जाऊ शकलो आणि वेगवेगळ्या प्रकरच्या लोकांना भेटू शकलो.'
- 'आता मला दाढी राखण्याची इच्छा आहे, मात्र एअरफोर्समधील नोकरीच्या या टप्प्यावर मला दाढी राखण्याची परवानगी नाही. मला रोज शेव्ह करावे लागते.'
- त्यामुळे माझ्यासमोर दोन पर्याय आहेत - एक मी पेन्शनचा लाभ न घेता नोकरी सोडावी, किंवा रोज शेव्ह करत राहावे. मला मार्गदर्शन करा, मी काय करु ? नोकरी सोडू की चालू ठेवू ?
एअरफोर्स अधिकाऱ्याला मिळाला हा सल्ला
- या प्रश्नाला मदरशाने उत्तर दिले, 'जर इंडियन एअरफोर्सच्या नियमानुसार दाढी वाढवण्याची परवानगी नाही आणि नोकरीच्या सुरुवातीला तुम्ही करारावर स्वाक्षरी केली असेल तर अशा स्थितीत तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.'
- 'जर तुमची आर्थिकस्थिती चांगली असेल आणि नोकरी सोडल्यानंतर कमाईचा दुसरा स्त्रोत तुम्ही सहजासहजी शोधू शकत असाल तर नोकरी सोडू शकता.'
- 'मात्र जर तुम्ही कमाईचा स्त्रोत सहजासहजी शोधू शकत नसाल तर नोकरी सुरु ठेवावी आणि अल्लाहची माफी मागावी. त्यासोबतच दुसऱ्या नोकरीचा शोध घेत राहावा आणि नवी नोकरी मिळाल्यानंतर ही नोकरी सोडावी.'
- मदरशाने हे देखील म्हटले की, 'जर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य मिळत असेल आणि धार्मिक परंपरांचा अवलंब करण्याची अनुमती असेल, जी भारतीय संविधानाने दिलेली आहे, त्यानंतरही तुमचा विभाग दाढी ठेवण्याची परवानगी देत नसेल तर तुम्ही एखाद्या वकीलाचा सल्ला घेऊ शकता.'
- दारुल उलूमचे उपाध्यक्ष मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्याने दाढी ठेवण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर त्यांना देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...