आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे : दारूल उलूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड- मुस्लिमांनी निवडणूक प्रक्रियेत मनापासून सहभागी होऊन योग्य उमेदवाराला मत द्यावे, असे आवाहन लखनऊच्या दारूल उलूम उलेमाओ स्कूलचे मुख्य संचालक व मुस्लिम विचारवंत मौलाना रबी हसन नादवी यांनी केले आहे.
मुस्लिमांनी राजकीय प्रक्रियेपासून दूर राहिल्यास त्याचा त्यांना फटका बसेल, असे नादवी यांनी एका मुलाखतीत सांगितले. आपण अराजकीय व्यक्ती असल्याने मुजफ्फरनगर दंगलीच्या मुद्दय़ावरून कोणताही राजकीय वाद वाढवण्याची इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले. इस्लाम हा मानवतावादी धर्म आहे. आपल्याला काही गोष्टी का सोसाव्या लागत आहेत, याचा विचार मुस्लिमांनी करणे आवश्यक आहे. मौलाना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख आहेत. आपल्या समाजातील सदस्यांनी मानवतेच्या दृष्टीने अन्य लोकांची हृदय जिंकावीत. मुस्लिमांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडाव्यात. मात्र, संपूर्ण गरजांसाठी राज्य किंवा केंद्रावर अवलंबून राहू नये. मुस्लिमांनी विवाहासारख्या समारंभावर अनावश्यक खर्च टाळावा. अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करावी. यामुळे गरिबांच्या शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यास मदत मिळेल, असे नादवी म्हणाले. उर्दू भाषेच्या प्रोत्साहनाबाबत ते म्हणाले, मुस्लिमांनी ऐतिहासिक भाषावाढीसाठी सदैव चालना दिली पाहिजे.