आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रांच्या मदतीने भूतानला गेलेल्या धावपटूंनी पटकावले सुवर्णपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वापी - आंतरराष्ट्रीय स्टुडंट ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे दशरथ राजपूत आणि मोहंमद अब्दुल्ला यांना मित्रांनी मदत केली नसती तर त्यांना या यशापर्यंत पाेहाेचणे खडतर ठरले असते. केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली प्रशासनाने खेळाडू रवाना होण्यापूर्वी २४ तास आधीपर्यंत त्यांची फाइल दाबून ठेवली होती. "भास्कर'ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर हितचिंतकांनी पैसे आणि मदतीची तयारी दर्शवली आणि त्यामुळेच दोघे स्पर्धेत सहभागी होऊ शकले.

दादरा नगर हवेली प्रशासनाचे क्रीडा विभागाचे वार्षिक बजेट एक कोटी आहे. प्रशासन एक कोटी रुपयांपैकी दोघा खेळाडूंना स्टुडंट ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यासाठी ५० हजार रुपये देऊ शकले नाही. १४ मे रोजी दोघांना भूतानला जावयाचे होते. मित्रांच्या मदतीने त्यांनी भूतान गाठले आणि यश संपादन केले. दशरथ राजपूतने १९ मे रोजी ५००० मीटर धावण्याची स्पर्धा १४.५८ मिनिटांत पूर्ण केली आणि सुवर्णपदक पटकावले. मोहंमद अब्दुल्लाने ३००० मीटर धावण्याची स्पर्धा ९.२१ मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. दोघेही राजधानी सिल्वासाच्या एसएसआर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
बातम्या आणखी आहेत...