आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daughter And Son In Law Accused Of Rape And Murder Of BJP Woman Leader Pictures

भाजप महिला नेत्या असलेल्या आईचा खून केला या मुलीने, पाहा पर्सनल लाइफ PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ (उत्तरप्रदेश) - गोरखपूर येथील भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या कविता गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी त्यांची मुलगी लकी उर्फ अमृता आणि तिचा पती सैय्यद कमर खुशनुर उर्फ शेरु या दोघांना अटक करण्यात आली आहे. लकीचे तिच्या आईसोबत संबंध फार काही चांगले नव्हते, त्यामुळेच तिने पतीसोबत कट रचून आईला संपवल्याचा तिच्यावर आरोप आहे. पोलिसांनी तिला व तिच्या पतीला अटक केली असून त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगाही आता तुरुंगात आहे.
लकीचे फेसबुक पेज पाहिल्यानंतर ती बिनधास्त आयुष्य जगत असल्याचे लक्षात येते. त्यासोबतच ती पतीसोबतही खुष नव्हती असे दिसून येते. लकीने काही दिवसांपूर्वी फेसबुक प्रोफाइलवर लिहिले होते, 'वेट अँड वॉच एव्हरी वन आय एम गोईंग टू गिव्ह अ बीग धमाका' तिच्या या स्टेटसचा तेव्हा कोणी एवढा विचार केला नव्हता, मात्र जेव्हा कविता गुप्ता यांच्या हत्येचा तपास करता जेव्हा लकीकडे पोलिसांनी संशयाची सुई वळवली तेव्हा तिच्या त्या बीग धमाक्याचा अर्थ सर्वांना कळाला. आईच्या संपत्तीसाठी लेकीनेच तिचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तापासात दिसून आले आहे.
लकीच्या विवाहामुळे पित्याने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
लकीने शेरु सोबत कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. शेरुचे चालचलन चांगले नसल्याचे कुटुंबियांना माहित होते. मुलींची छेडछाड काढणे, यासारखे प्रकार तो करत होता. मृत कविता गुप्ता यांचे नातेवाईक आता लकी आणि शेरुच्या वागणूकीमुळे कविता व त्यांचे पती दिवंगत दुर्गेश गुप्ता त्रस्त असल्याचे दबक्या आवाजात बोलत आहेत. मुलीच्या विवाहामुळे त्रस्त दुर्गेश यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
कविता गुप्तांचा जावई शेरू करत होता मुलींची छेडछाड
शेरुबद्दल त्याचे शेजारी आणि त्याला ओळखणारे सांगतात, की त्याची वागणूक चांगली नव्हती. काजीपूरमध्ये तो दुर्गेश गुप्तांच्या घरासमोर तासन् तास बसलेला राहात होता. येणार्‍या जाणार्‍या मुलींवर अश्लील कॉमेंट्स करत राहात होता. मुलींची छेडछाड आणि काजीपूर येथील छोट्या-मोठ्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असायचा. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबत नाते तोडले होते. गुप्ता कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितले, की शेरुच्या या वागणूकीमुळे लकी देखील त्रस्त राहात होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लकी उर्फ अमृताचे पर्सनल लाइफ फोटोज्