आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daughter In Law Blames That His Father In Law Raped Her

हुंड्यासाठी पतीने मारला चाकू तर पोलिस सहआयुक्त सासर्‍याने केला वारंवार बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पीडितेचे संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
फोटो - पीडितेचे संग्रहित छायाचित्र.
लखनऊ - उत्‍तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला भोगाव्या लागलेल्या नरक यातनांची माहिती समोर आली आहे. महिलेचे सासरे डॉ. शंकर चरण त्रिपाठी विक्री कर विभागात सहआयुक्त पदावर फैजाबादमध्ये तैनात आहेत. ते ज्योतिषीही आहेत. आपल्या डॉक्टर मुलीच्या मदतीने सुनेला बेशुद्ध करून तो तिच्यावर बलात्कार करायचा अशी माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर या तरुणीला सासरा आणि नवर्‍याच्या अत्यंत किळसवाण्या कृत्यांनाही सामोरे जावे लागले होते.

हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार करणार्‍या अनुने (काल्‍पनिक नाव) सांगितले की, गेल्यावर्षी 18 जानेवारीला जेव्हा मांडवात विवाहाचे विधी सुरू होते त्यावेळी सासर्‍याने तिच्या वडिलांकडे हुंड्यापोटी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. रक्कम न दिल्यास अगदी लग्न मोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. पहिल्याच रात्री तिच्या पतीने तिच्याबरोबर अनैसर्गिक पद्धतीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आली.
महिनाभरानंतर पतीची वागणूक आणि अत्याचाराबाबत तिने सासर्‍याला सांगितले. त्यावर सासर्‍यानेही हुंड्याच्या मुद्यावरून टोमणे सुरू केले. 22 ऑगस्ट 2014 रोजी तर नवर्‍याने हुंड्यासाठी चाकूहल्ला केला होता, असेही तिने सांगितले. त्यानंतर डॉक्टर असलेल्या तिच्या नणंदेने तिचा उपचार केला. त्यानंतर इंजेक्शन देऊन तिला अनेक दिवस बेशुद्ध ठेवण्यात आले होते.


गँगरेपचाही प्रयत्न
सासरा बेशुद्धावस्थेत वारंवार तिच्यावर बलात्कार करत होता असे अनु म्हणाली. शुद्धीत आल्यानंतर याची जाणीव होत होती, असे तिने सांगितले. पण बदनामी होण्याच्या भीतीने ती कोणाला काही बोलली नाही. सासर्‍याने तिच्या अश्लिल क्लिप तयार केल्या होत्या असेही, तिने सांगितले. कोणाला सांगितल्यास त्या क्लिप पोर्न साइटवर अपलोड करण्याची धमकी सासरा तिला देत होता. पती सौरभ त्रिपाठी, सासरा शंकरचरण त्रिपाठी, दीर गौरव त्रिपाठी, नणंद अजिता त्रिपाठी आणि नोकर टिंकू तिला मारहाण करायचे असा आरोप तिने केला आहे. गेल्यावर्षी तर शंकरचरण, सौरभ आणि गौरव तिघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. पण ती कशीबशी पळून गेली आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते.
सुनेवरच आरोप...
आरोपी शंकरचरण त्रिपाठी यांनी या प्रकरणी सुनेवरच आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्यावेळी 28 ऑक्टोबर 2014 रोजी जानकीपुरम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. त्यावेळीही तिने असेच आरोप केले. पण पोलिसांनी चौकशी करून आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले होते. त्याआधी 23 जुलैला मुलगा सौरभ जेव्हा पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला त्यावेळी त्याला मारहाण केली होती अशा आरोप त्यांनी केला आहे. त्या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल आहे. त्यामुळे घरच्यांना अटक होऊ नये म्हणून खोटे आरोप लावले जात अशल्याचे ते म्हणाले आहेत.
पुढे वाचा, आरोपी सासर्‍याचा थाट... आणि कसा झाला होता दोघांचा विवाह