आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daughter In Law Entitled To Compassionate Job:HC

विधवा सुनही मुलीप्रमाणे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यास पात्र, हायकोर्टाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर/उदयपूर - हाईकोर्टाने उदयपूरमध्ये रुग्णालयात नोकरी करणा-या सासूच्या मृत्यूनंतर तिच्या विधवा सुनेला नोकरी नाकारण्याच्या राज्य सरकारचा आदेश फेटाळून लावला आहे. अशा प्रकरणात सून ही मुलीप्रमाणेच असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने तिला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांना दिले आहेत.

उदयपूर येथील चंदा कुंवर यांच्या वतीने दिलीप कावडिया यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी कोर्टात सांगितले की, याचिकाकर्त्यांची सासू प्रेमदेवी उदयपूर येथील पन्नाधाय सरकारी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होती. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या विधवा सुनेने अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज सादर केला. त्यावर सरकारने नियमांकडे बोट दाखवत हा अर्ज फेटाळला. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी केवळ मुलगा किंवा मुलगीच पात्र असते, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.
चंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांची नोकरी मिळण्याची आशा वाढली आहे. कायमस्वरुपी तत्वावर नोकरी मिळाल्यास मुलांचे पालन पोषण करणे सोपे जाईल असे त्या म्हणाल्या. कोर्टाने त्यांची याचिका मान्य करत मृत सासू सासरे असल्याने काही फरक पडत नसल्याचे स्पष्ट केले.
पिंकी विरुद्ध राज्य सरकार खटल्याचा उल्लेख

कावडिया यांनी 2012 मध्ये श्रीमती पिंकी विरुद्ध राज्य सरकार खटल्याचा उल्लेख करत याचिकाकर्त्यांना नियुक्ती देण्याचा उल्लेख यावेळी केला. घरात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. पण सरकारी वकिलांनी पिंकी प्रकरणात सास-यांच्या मृत्यूचे प्रकरण असल्याचे सांगितले. पण चंदा यांचे सासरेही नसल्यामुळे पालणपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या बाजुने निर्णय दिला.

फाइल फोटो - फाइल फोटो जोधपूर हायकोर्ट