आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Daughter In Law\' Of Pakistan Sania Mirza Not Fit To Be Telangana\'s Brand Ambassador: BJP

\'पाकिस्तानची सून\' सानियाला कसे बनवले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, भाजप नेत्याचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलंगणाचे भाजप नेते के. लक्ष्मण यांनी बुधवारी टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला राज्याचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्याच्या निर्णयचा तीव्र विरोध केला आहे. 'पाकिस्तानची सून' असणारी सानिया या सन्मानाच्या लायक नसल्याचेही लक्ष्मण यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक कोटी रुपयांचे ग्रँट देऊन सानियाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले होते. यावेळी सानियाला त्यांना 'हैदराबाद की बेटी' असेही संबोधले होते.
तेलंगणा या नव्या राज्याच्या विधानसभेत भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते लक्ष्मण यांना पकत्रकारांशी बोलताना आपला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, सानियाचा जन्म महाराष्ट्रात झाला होता. त्यानंतर ब-याच कालावधीनंतर सानिया हैदराबादेत स्थायिक झाली होती. त्यामुळे ती स्थानिक नसल्याचे मत लक्ष्मण यांनी मांडले होते. तसेच सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्याबरोबर विवाह केला होता. त्यामुळे ती पाकिस्तानची सून आहे.
या सर्वानंतरही तिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवणे यामागे केवळ मुस्लीम मते मिळवण्याचाच हेतू असल्याचे स्पष्ट होते असे लक्ष्मण म्हणाले. हैदराबादमध्ये हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांतच होणार आहे.
सानियाने प्रत्युत्तर
सानियाने या प्रकरणी लगेचच तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. माझा विवाह पाकिस्तानी क्रिकेटपटूबरोबर झाला असला तरी, मी भारतीय आहे आणि मरेपर्यंत भारतीयच राहणार असे सानियाने स्पष्टपणे सांगितले. हैदराबादशी आपल्या संबंधाचाही तिने उल्लेख केला. आपल्या पूर्वजांना हैदराबादसाठी मोठे योगदान दिले असून, केवळ शोएबबरोबर विवाह झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.
सानिया म्हणाली, या मुद्यामुळे मी अत्यंत दुःखी झाले आहे. अशा वक्तव्यांचा मी निषेध करते. ज्यांना दुस-यांचा आनंद सहन होत नाही, अशा लोकांसाठी मी प्रार्थना करते, असे सानियाने ट्वीट केले.
जोशी यांचीही टीका
दरम्यान भाजपचे वरिष्ट नेते मुरली मनोहर जोशी यांनाही सानियाला 'पाकिस्‍तानची सून' म्हणणा-या नेत्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मी अशा लोकांबाबात काही बोलू शकत नाही. अशा वक्तव्यांवरून त्यांचे विचार स्पष्ट होतात.'
पुढील स्लाइड्सवर पाहा या प्रकरणाशी संबंधित काही फोटो...