आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरमध्ये रहाते लालू प्रसाद यादव यांची ही कन्या, बनू शकते बिहारची उपमुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर राजीनाम्यासाठी दवाब वाढत असताना राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी नवा प्लान बनवला आहे. सूत्रांनूसार, लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांच्या खूर्चीवर त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांना बसवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रोहिणी या सध्या पती आणि मुलांसोबत सिंगापूर येथे राहातात.

लालू-राबडी यांची दुसरी कन्या आहे रोहिणी...
- लालू आणि राबडी यांना नऊ आपत्ये आहेत. रोहिणी ही लालूंची धाकटी कन्या आहे. मीसा भारती ही लालूंची थोरली कन्या आहे.
- रोहिणी यांचा विवाह 2002 मध्ये एक अणे मार्ग, पाटणा येथे झाला होता. त्यांचे पती समरेश सिंग कॉम्प्युटर इंजिनिअर आहे.
- रोहिणी आणि समरेश तीन मुलांसह (कन्या अयन्ना आणि आदित्य सिंह, अरिहंत सिंह) सिंगापूरला राहातात.
- मीसा यांच्याप्रमाणेच रोहिणी यांनी MGM मेडिकल कॉलेज जमशेदपूरमधून MBBS केले आहे.
- रोहिणी यांनी देखील मीसा यांच्याप्रमाणे कधी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली नाही.

वाद आणि रोहिणी एक समीकरण...
- 2002 मध्ये 7 जूनला रोहिणी यांचा विवाह पाटण्यात झाला होता. विवाहात 25 हजार वराती आले होते.
- पाहुण्यासाठी मारूती आणि महिंद्राच्या विना नंबर प्लेट नव्या कोर्‍या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
- विशेष म्हणजे या विवाह समारंभाचे लाइव टेलिकास्ट केबलद्वारा पाटण्यात दाखवण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... लालू कन्या रोहिणी आचार्य यांचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...