आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पाची \'भानगड\'- मुलीला सतावत होती ती भीती; मित्रालाच तिने दिली 12 लाखांची सुपारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिखानेच 12 लाखांची सुपारी देऊन बापाचा खून घडवला. - Divya Marathi
शिखानेच 12 लाखांची सुपारी देऊन बापाचा खून घडवला.
मेरठ - येथे 1 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या मनोज हत्याकांडचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मनोजची हत्या त्याच्या मुलीनेच तिच्या मित्राला 12 लाखांची सुपारी देऊन केली होती. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
 
मुलीला होती बापाची भीती- संपत्तीतून बेदखल करण्याची
- एसपी मानसिंह चौहान यांनी घटनेचा उलगडा करत सांगितले की, मनोजचा खून त्याची मुलगी शिखा हिनेच घडवला होता.
- चौकशीत कळले की, मनोजचे कुटुंबातील एका महिलेशी अवैध लैंगिक संबंध होते, याची माहिती शिखाला कळली होती. शिखाने अनेकदा आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता.
- 26 ऑगस्टला या गोष्टीवरून कुटुंबात खूप वाद झाले. शिखाला भीती वाटत होता की, तिचा बाप छोटी बहीण साक्षी आणि भाऊ अभयला आपल्या संपत्तीतून बेदखल करून टाकीन. म्हणूनच तिने बापाच्या हत्येचा कट रचला.
- शिखाने आपल्या फेसबुक फ्रेंड हिमांशूला संपर्क केला. हिमांशू तिच्या छोटी बहीण साक्षीचा क्लासमेट होता. शिखाने हिमांशूला मोहिउद्दीनपूरला बोलावले आणि आपल्या वडिलांच्या खुनाच्या बदल्यात त्याला 12 लाख रुपये कॅश देण्याची ऑफर दिली.
- एवढी मोठी रक्कम मिळत असल्याचे पाहून हिमांशूचीही मती फिरली आणि त्याने होकार दिला. त्याने या कामासाठी इतर दोन शूटरला काँटॅक्ट केला. हिमांशूने या दोघांना मनोजच्या हत्येची सुपारी दिली. यानंतर कटानुसार 1 सप्टेंबरला दोन शूटरनी घरात झोपलेल्या मनोजची गोळ्या झाडून हत्या केली.
 
स्वत: दरवाजा उघडला होता शिखाने खुन्यांसाठी
- पोलिस सूत्रांनुसार, घटनेच्या दिवशी कटानुसार दोन्ही शूटर आणि हिमांशूला बोलावण्यात आले. पहाटे साडेचार वाजता शिखाने घराचा दरवाजा उघडला आणि दोघांनी खाटेवर झोपत असलेल्या मनोजच्या डोक्याला बंदूक लावून गोळी मारली.
- मनोजच्या जवळच त्याचा भाऊ प्रवीणही झोपलेला होता. शिखाने स्वत: शूटर्सना इशारा करून तिचा बाप मनोज कुठे झोपलाय ते दाखवले होते. पोलिसांनी शिखाकडून एक मोबाइल आणि टॅब हस्तगत केला आहे. याद्वारे ती हिमांशूशी चॅटिंग करत होती.
- एसपी म्हणाले, आरोपी हिमांशू, लोकेंद्र आणि हिमांशूच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल.
 
तब्बल 200 एकर जमीन आहे मनोजच्या नावे
- पोलिस तपासात समोर आले की मनोजच्या नावे तब्बल 200 एकर जमीन आहे. शिखाला संशय होता की तिचे वडील तिच्या छोट्या बहीणीची आणि भावाची हत्या करतील आणि संपत्तीतून बेदखल करतील. शिखा बीए सेकंड इयरला आहे.
- पोलिसांनी आरोपी शिखाला अटक करून कोर्टात हजर केले, तिथे तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...