आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने दिली आई आणि तिच्या प्रियकराविरुद्ध साक्ष, म्हणाली- \'आई वाईट आहे, तिला फाशी द्या\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर/पाटणा (बिहार) - बिहारमधील एका मुलीच्या जबाबावरुन भागलपूर जिल्हा सत्र न्यायालयाने तिची आई आणि आईच्या प्रियकराला दोषी ठरविले आहे. कोर्टाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे निकालात म्हटले आहे. हत्येच्या या प्रकरणात कोर्टात 16 वर्षांच्या मुलीने स्वतःच्या आईला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ती म्हणाली, माझ्या वडीलांची हत्या आई आणि तिचा प्रियकर मणिकांत यादव यांनी मिळून केली.
- मुलगी कोर्टात म्हणाली, 'जज साहेब माझी आई अतिशय वाईट आहे, तिला फाशीची शिक्षा द्या.'
- न्यायमुर्ती सुषमा त्रिपाठी यांनी मुलीची साक्ष महत्त्वाची मानत आरोपी आई बेबी कुमारी आणि तिचा प्रियकर मणिकांत यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरविले. दोघांना 21 सप्टेबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
- शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे म्हटले. कोर्टाने याला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ठरविले आहे.
- कोर्टाने मृत रामानंद यांची मुलगी आणि मुलगा यांचे जबाब आणि पोलिसांनी जमवलेल्या पुराव्यांच्या आधारावर दोन्ही आरोपींनी दोषी ठरविले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, बेबीने पोलिसांना काय-काय सांगितले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...