आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर- सीनियर नॅशनल रेसलिंगमध्ये दिव्या काकरान हिने 68 केजीमध्ये गोल्ड मेडल जिंकले. ती रिंगमध्ये कुस्ती लढत होती, तेव्हा तिचे वडिल सूरज काकरान बाहेर रेसलर्सचे कपडे विकत होते. विजयी होताच दिव्या बाहेर गेली आणि तिने वडिलांच्या गळ्यात मेडल टाकले. 19 वर्ष वय असलेल्या दिव्याने सांगितले की, रेसलिंगमध्ये यश मिळवल्यानंतरही कुटुंबाची परिस्थिती बरोबर नाही. घर चालवण्यासाठी आई रेसलर्सचे कपडे शिवते आणि पप्पा ते मॅच सुरू असताना विकतात. स्टेडिअमच्या बाहेर त्यांचा स्टॉल आहे.
दिल्लीची राहणारी आहे दिव्या..
- दिव्याने सांगितले की, ती दिल्लीची राहणारी आहे, परंतु तिने उत्तर प्रदेशकडून स्पर्धेत सहभाग घेतला. युपीत रेसलर्स चॅपीयनला चांगले पैसे दिले जातात त्यामुळे तिने युपीचे प्रतिनिधीत्व केले.
- दिव्याने सांगितले की, रेसलिंगमध्ये जाटांचा दबदबा आहे आणि ती मागासलेल्या जातीतील आहेत. यामुळे अनेकदा तिला अपमानाचा सामना करावाल लागला. परंतु, तिने हिम्मत हारली नाही आणि आज रिझल्ट समोर आहे.
किडनी स्टोनमुळे होती आजारी...
- दिव्या किडनी स्टोनमुळे पीडित होती. यामुळे तिला काही काळ रेसलिंगपासून दूर रहावे लागले होते.
- तिने दिल्लीच्या एम्समध्ये याची ट्रीटमेंट घेतली. आता ती अंडर-23 वर्ल्ड चँपियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी पॉलंड येथे जाणार आहे.
- यानंतर तिचे टार्गेट कॉमनवेल्थ गेम आणि एशियन गेम्समध्ये देशासाठी मेडल जिंकने हे आहे.
10 वर्षाच्या वयात केला मुलांशी सामना....
- फोगाट बहिनींप्रमाणे दिव्यालाही सुरूवातीचे यश मुलांना हरवूनच मिळाले.
- तिने 10 वर्षाच्या वयात मुलांशी कुस्ती केली आहे. तिच्यासोबत लढण्यास कोणताही मुलगा तयार होत नव्हता. नंतर एक मुलगा तयार झाला.
- त्याच्या वडिलांनी घोषणा केली की, या मुलीने माझ्या मुलाला हरवले, तर मी तिला 500 रूपये देईल आणि दिव्या जिंकली.
- त्या दिवसाआधी दिव्याने कधीच 500 रूपयांच्या नोटेला स्पर्श देखील केला नव्हता. तेव्हा तिने रेसलिंगमध्येच करियर करयाचे ठरवले.
पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.