आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती लैंगिक छळ करेल या भीतीने उच्चशिक्षित आईनेच चिरला पोटच्या मुलींचा गळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आपल्या पोटच्या दोन मुलींचा गळा चिरुन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका उच्चशिक्षित महिलेला पोलिसांनी अटक केले. पती आपल्या मुलींचे लैंगिक शोषण करेल,अशी तिला भीती होती. त्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे पो‍लिसांना सांगितले. रजनी चुटके असे आरोपी महिलेचे नाव असून ती एमबीए शिक्षित अाहे.
पोलिसांनी ‍दिलेली माहिती अशी की, बेगमपेट भागातील टीचर्स कॉलनीत बुधवारी रात्री ही घटना घडली. आरोपी रजनी चुटके हिने आपल्या दोन्ही मुलींची (अश्विका (8) व अविष्का (3)) गळा चिरुन हत्या केली. पती आपल्या मुलींचे लैंगिक शोषण करेल, असा रजनीला संशय होता. विनय असे रजनीच्या पतीचे नाव असून त्याचे गिफ्ट शॉप आहे. ही फॅमिली महाराष्ट्रातून हैदराबादला स्थायिक झाली आहे.

रजनीने मित्रांना पाठवला मुलींची हत्या केल्याचा मेसेज ...
रजनीने मुलींची हत्या करून आपल्या दोन मित्रांना मेसेज केला होते. त्यात तिने पती आपल्या मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याचे म्हटले आहे. मुलींची हत्या केल्यानंतर रजनीने एका कालव्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला लोकांना वाचवले.
मुलींची हत्या करून रजनीने केले पलायन...
-विनय चुटके बुधवारी रात्री 10 वाजता शॉप बंद करून घरी पोहोचला. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. त्याने घरात प्रवेश केला तर त्याला रजनी कुठेच दिसली नाही. घरात जॅमची बाटली पडलेली दिसली. त्याने रजनी व मुलींना हाक मारली. मात्र, त्याला कोणाचाच आवाज आला नाही. त्याने शोध घेतला असता एक मुलगी बेडरुममध्ये तर दुसरी बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. विनयने पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनी रजनीला अटक केले.

अश्विका घाबरत होती वडिलांना...
- रजनीने पोलिसांना सांगितले की,. मोठी मुलगी अश्विका ही विनयला खूप घाबरत होती.
- रजनी व विनयचे गेल्या आठवड्यात कडाक्याचे भांडण झाले होते.
- पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहे.
बातम्या आणखी आहेत...