आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींनीच दिला खांदा, फक्त पाहत होते गावकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जहानाबाद (बिहार) - येथील सिव्हिल कोर्टात नोकरी करणारे विनोद कुमार यांचा बुधवारी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला मुलींनीच खांदा दिला आणि स्मशानापर्यंत घेऊन गेल्या. येथे मुलींनीच मुलाचे कर्तव्य पार पाडून वडिलांना मुखाग्नि दिला. मृत विनोद यांना मुलगा नव्हता. यामुळे मृत्युनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आली तेव्हा तेव्हा गाव आणि शेजारचे कोणीही पुढे आले नव्हते. यामुळे मुलींनीच ही जबाबदारी उचलली.

 

जेव्हा मुलींनी उचलले पार्थिव तेव्हा समोर आले लोक
- मृतदेहाला खांदा देण्यासाठी कुणीही पुढे आले नाही तेव्हा मृत विनोद यांच्या दोन्ही मुली सुरुची आणि ज्योतीने कुणाचीही परवा न करता ही जबाबदारी उचलली. यानंतर गाव आणि शेजारचे इतर लोकही पुढे आले. बुधवारी ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. घरात इतर कोणीही पुरुष सदस्य नव्हता. यामुळे अंत्यसंस्कारात अडचण आली होती. परंतु ही जबाबदारी दोन्ही मुलींनीच उचलली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...