आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या निशाण्यावर दिल्ली, मुंबईतील 1993 सारखे स्फोट घडवण्याचे दिले आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम दिल्लीवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, दाऊद पाकिस्तानत लपून बसलेला आहे. त्याने त्याच्या हस्तकांमार्फत दिल्लीत घातपाती कारवाय करण्याचे षडयंत्र रचले आहे.

दाऊदने स्ट्रॅटेजी बदलली
- दाऊदने त्याच्या गुंडांना हल्ल्याचे आदेश दिले आहेत. हा हल्ला मुंबईत 1993 मध्ये झालेल्या हल्ल्या प्रमाणेच राहील असे म्हटले जात आहे. यावरुन या हल्ल्यांच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो.
- मुंबई बॉम्ब स्फोटात 257 लोक मारले गेले होते.
- या रिपोर्टनुसार दाऊदचा भारतातील हस्तक्षेप हा आतापर्यंत फक्त बनावट नोटा आणि ड्रग्ज तस्कीरीपर्यंतच सीमित होता.
- मात्र आता त्याने स्ट्रॅटेजी बदलली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

IB ने इंटरसेप्ट केला मॅसेज
- इंटीलिजन्स ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी काही संदेश इंटरसेप्ट केले होते.
- त्यानुसार डी कंपनीने भारतात काही लोकांना हायर केले आहे.
- याच लोकांकडे दिल्लीत सीरियल ब्लास्ट करण्याची कामगिरी सोपविली आहे.

मध्य प्रदेशातील हस्तकांकडे सोपविली कामगिरी
- अशी माहिती आहे, की डी कंपनीने मध्यप्रदेशातील काही गुंडांकडे दिल्लीत घातपाती कृत्य घडवून आणण्याची जबाबदारी सोपविली आहे.
- रिपोर्टनुसार, त्यांनी दिल्लीच्या दिशेने काम सुरु केले आहे.
- दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- पोलिस दाऊदच्या गुंडांना ताब्यात घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत.
या ठिकाणांना करणार लक्ष्य
- रिपोर्ट नुसार, सुरक्षा अधिकाऱ्यांनी काही लोकांकडे चौकशी केली आहे.
- त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदच्या गुंडांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा 24X7 घेत आहेत.
- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली मेट्रो, विधानसभा आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे दाऊदच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...