आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा मुंबईचा डॉन अनेकदा झोपलाय उपाशी, वडील होते प्रामाणिक, कर्तव्यदक्ष पोलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐंशी आणि नव्‍वदच्‍या दशकात मुंबई आणि अंडरवर्ल्‍ड हे समीकरण पक्‍के झाले होते. दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन या मध्‍यवर्गीय कुटुंबातून आलेल्‍या दोन तरुणांच्‍या नावाने अनेकांची बोबडी वळत असे. यापैकी छोटा राजनला अटक करण्‍यात यश आले आहे. मात्र, त्‍याचा 'गुरू' आणि कट्टर शत्रू असलेला दाऊद अजूनही फरार आहे.
भारताने सध्या पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे अनेक पुरावे भारत सरकारने आतापर्यंत पाकिस्तानला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जन्‍मलेल्‍या दाऊदचे बालपण कसे गेले, तो अंडरवल्‍वर्डमध्‍ये कसा आला ? मराठी भाषेवर त्‍याचे प्रेम कसे आहे, याचा खास वृत्‍तांत divyamarathi.com च्‍या वाचाकांसाठी...

डोंगरी परिसरामध्ये गेले बालपण
दाऊद इब्राहिम कासकर याचा जन्म 27 डिसेंबर 1955 रोजी रत्नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये झाला होता. त्‍याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होते. त्‍यांना दाऊदसह‍ एकूण सात मुलं होती. प्रामाणिक आणि कर्तव्‍यदक्ष कर्मचारी म्‍हणून त्‍यांचे पोलिस दलात आजही नाव घेतले जाते. दाऊदचे लहानपण मुंबईच्‍या डोंगरी परिसरामध्‍ये गेले. इतक्‍या मोठा कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळताना त्‍याच्‍या वडिलांची दमछाक होत असे. त्‍यामुळे अनेक वेळा दाऊदला उपाशीपोटी झोपावे लागत असे. लहानपणीच त्‍याने शाळा सोडली. दरम्‍यान, किशोर अवस्‍थेत ड्रग्स सप्लाय, चोरी, लूटपाट करणे त्‍याने सुरू केले.

हाजी मस्तानने दिली साथ
त्‍या काळात मुंबईच्‍याच नव्‍हे तर देशाच्‍या स्मगलिंग क्षेत्रात मस्तान आणि करीम लाला यांचे नाव होते. डोंगरी परिसरात राहत असताना दाऊदची त्‍यांच्‍यासोबत भेट झाली. याच दोघांच्‍या छत्रछायेखाली त्‍याने 1977 मध्‍ये पहिल्‍यांदा हाजीअलीमध्‍ये स्मगलरांची बोट लुटली होती. इथूनच त्‍याच्‍या गुन्‍हेगारी कारवाया सुरू झाल्‍यात. पुढे त्‍यात वाढच होत गेली.


गँगवारचा फायदा घेतला

पोलिस सूत्रांनुसार, दाऊद हा कुशाग्रह बुद्धीचा आहे. त्‍या काळात मुंबई अंडरवर्ल्डमध्‍ये हाजी मस्तान गँग आणि पठाण गँगमध्‍ये होत असलेल्‍या गँगवॉरचा त्‍याने फायदा घेतला. दोन्‍ही गँगमधील बहुतांश सदस्‍य एकमेकांच्‍या हल्‍ल्‍यात ठार झाले. दरम्‍यान, हाजी मस्तान राजकारणात घुसला. त्‍यानंतर दाऊद त्‍याच्‍या गँगचा सूत्रधार बनत आपली वेगळीच गँग तयार केली. त्‍यामुळे दोघांमध्‍ये धुसफूस वाढली.

पहिल्‍यांदा स्‍वबळावर लुटली कॅश व्‍हॅन

गल्‍लीतील गुंडा ते आंतरराष्‍ट्रीय डॉन असा दाऊदचा प्रवास आहे. सिनेमातील पात्राप्रमाणेच त्‍याचे आयुष्‍य आहे. मुंबईमध्‍ये स्मगलर हाजी मस्तान याच्‍यासोबत होत असलेल्‍या धुसफुसीत दाऊदने त्‍याला धडा शिकवण्‍याचा निश्‍चय केला. त्‍यासाठी त्‍याने 4 डिसेंबर 1987 च्‍या सायंकाळी हाजी मस्तान याची कॅश घेऊन जाणाऱ्या मेट्रोपॉलिटन बँकेचील कार लुटण्‍याचा प्‍लॅन केला. त्‍यावेळी त्‍याचे वय केवळ 19 वर्षे होते. या कामात त्‍याला शेर खान, अबू बकर, नुसरत खान, एजाज सिद्दिकी, अजीज चालक, सैयद सुल्तान, शेर खान आणि अब्दुल यांनी सहकार्य केले. या सगळ्यांना दाऊदने मस्जिद बंदर रोड ते बोरा बाजार आणि छोटे ब्रिजच्‍या वेगवेगळ्या जाग्‍यावर तैनात केले. या सगळ्यांकडे चाकू, गुप्ती आणि देशी कट्टे होते. 2:30 वाजता कार सिग्नलवरून पुढे सरकली तसे शेरखान आणि साईद यांनी हात दाखवत कारला थांबवले आणि विघुत वेगाने चालकाचा दरवाजा उघडून त्‍याच्‍यावर हल्‍ला केला. दरम्‍यान, मागच्‍या सीटवर बसलेल्‍या दोन मारवाडी व्‍यक्‍तींना स्‍वत: दाऊद याने मारहाण करण्‍यास सुरुवात केली. त्‍यानंतर दाऊन कारमधील आणि डिक्‍कीमध्‍ये असलेले दोन सुटकेस घेतल्‍या आणि त्‍या ठिकाणहून पसार झाला. या सूटकेसमध्‍ये जवळपास 4.5 लाख रुपये होते.

वडिलांनीच केले पहिल्‍यांदा अटक
दिवसा ढवळ्या टाकलेल्‍या दरोड्याचा तपास दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांच्‍याकडे सोपावला. त्‍यांनी आपल्‍या दोन सहकाऱ्यांच्‍या मदतीने दाऊद आणि त्‍याच्‍या मित्रांना अटक केली. पोलिस रेकॉर्डनुसार, दाऊदला पकडल्‍यानंतर त्‍याच्‍या वडिलांनी स्‍वत:चा बेल्‍ट काढून त्‍याला चांगलेच सोलून काढले. पुधोनी पोलिस ठाण्‍यात नोंद असलेले हे प्रकरण आजही प्रलंबित आहे. दाऊद भारतात आल्‍यानंतर त्‍याची सुनावणी होणार आहे.

बाल्‍यावस्‍थेपासूनच शस्‍त्रांसोबत मैत्री
दाऊदला बाल्‍यावस्‍थेपासूनच तलवार, चाकू आणि देशी रिवॉल्वर आवडत होते. थोडे मोठे झाल्‍यावर तो यूपीमधील रामपूरमधून शस्‍त्र मागवायला लागला. 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोटात नाव आल्‍यानंतर दाऊद हा एक सामान्‍य स्मगलरपासून वॉन्टेड टेररिस्ट बनला. असे म्‍हणतात की या स्‍फोटातील मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमच आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, दाऊद मराठीतूनच बोलतो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...