आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेहचे किमान तापमान उणे १२ अंश सेल्सियस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजधानी दिल्लीही सध्या थंडीने गारठली आहे. - Divya Marathi
राजधानी दिल्लीही सध्या थंडीने गारठली आहे.
श्रीनगर - सातत्याने होणारी बर्फवृष्टी थांबताच संपूर्ण जम्मू-काश्मीर थंडीने गारठले आहे. लेहमध्ये किमान तापमान १२.१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. काश्मीर खोऱ्यासह जम्मू विभागातील पठारी प्रदेशात कडाक्याची थंडी पडली आहे.

हवामान विभागानुसार, गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ९.२ अंश, पहलगाममध्ये उणे ४.३ अंश तर श्रीनगरमध्ये उणे ०.८ अंश नोंदले गेले. काही दिवसांनंतर किमान तापमानात आणखी घट होईल, अशी अपेक्षा आहे. २१ डिसेंबरपासून काश्मीरमध्ये ४० दिवस झरे, पाण्याचे स्रोत आणि सरोवरांतील पाण्याचे रूपांतर बर्फात होऊ शकते.

राजधानी दिल्लीही गारठली : राजधानी दिल्लीही सध्या थंडीने गारठली आहे. शहराचे कमाल तापमान १५.७ अंश सेल्सियसपर्यंत तर किमान तापमान ६.८ अंशांवर आले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी हे तापमान अनुक्रमे १५.७ आणि ११.५ अंश सेल्सियस होते. राजधानीतील पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...