आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dbangon Set Fire To The House Of A Dalit Family, 2 Children Died

हरियाणा: गावकऱ्यांनी पेटवले दलिताचे घर; 2 चिमुरड्यांचा मृत्यू, पती-पत्नी गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितेंद्रच्या घराच्या दाराला पेटवून देण्यात आले होते - Divya Marathi
जितेंद्रच्या घराच्या दाराला पेटवून देण्यात आले होते
फरीदाबाद (हरियाणा) - येथील सनपेड गावात मंगळवारी सकाळी एका दलिताच्या घराला पेटवून देण्यात आले. यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे तर पती-पत्नी गंभीर भाजले आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोप आहे की गावातील गुंडांनी जुने वैर असल्याने हे कांड घडवून आणले. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पहाटे चार वाजता लावली आग
हरियाणामधील फरिदाबादमधील बल्लभगड भागातील सनपेड गावात मानुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. दलित समाजाच्या जितेंद्रचे कुटुंब मंगळवारी पाहाटे गाढ झोपेत असतानी त्याच्या घराला पेटवून देण्यात आले. घरातील लोकांनी आरडाओरड केली तेव्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत त्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि एक वर्षांची मुलगी गतप्राण झाली होती. या जाळपोळीत जितेंद्र आणि त्याची पत्नी गंभीर भाजले. त्यांना दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गावात तणावाचे वातावरण
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस गावात दाखल झाले. बातमी लिहिपर्यंत गावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या माहितीनूसार गावातील काही लोकांसोबत दलित कुटुंबाचा जूना वाद होता. 5 ऑक्टोबर रोजी गावातील दुसऱ्या समाजाच्या 3 जणांची हत्या झाली होती. या हत्येचा दलितांवर आरोप ठेवण्यात आला होता. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचे बोलले जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत फोटो