(फोटो: आयटम गर्लसोबत ठुमके लावताना भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक उपाध्याय)
गिरिडीह- झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील टिकोटोली येथे 'चिलखारी-ए दर्द' या सिनेमाची मंगळवारी शूटिंग झाली. यासाठी कोलकाता येथून एका आइटम गर्लला निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक उपाध्याय आणि डीडीसी दिनेश प्रसाद हे देखील उपस्थित होते.
आयटम सॉंगचे चित्रीकरण सुरु असताना डीडीसी दिनेश प्रसाद व अशोक उपाध्याय यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. प्रसाद आणि उपाध्याय यांनी आयटम गर्लसोबत ठुमके लावले. दरम्यान, 'चिलखारी- ए दर्द'मध्ये मी एक छोटीशी भूमिका साकारत असल्याचे डीडीसी प्रसाद यांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्स क्लिक करून पाहा, VIDEO