आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dead Bodies Under Debris Caused By Utterakhand Flood

गुरुद्वारा हेमकुंड साहेबही उद्ध्‍वस्‍त, मलब्‍यातून मृतदेह बाहेर काढण्‍याचे मोठे आव्‍हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडमधील प्रलयात चामोली येथील प्रसिद्ध गुरुद्वारा हेमकुंड साहेब तसेच श्री लक्ष्‍मण लोकपाल मंदिरही उद्ध्‍वस्‍त झाले आहेत. गुरुद्वारात पूर्णपणे उद्ध्‍वस्‍त झाला आहे. या ठिकाणी रात्री भाविकांना थांबण्‍याची परवानगी नाही. त्‍यामुळे सुदैवाने हजारोंचे प्राण वाचले. केदारनाथ मंदिराच्‍या परिसरातच शेकडो लोकांचा मृत्‍यू झाला आहे. अजुनही मृतदेह तिथेच पडलेले आहेत. सरकारने मृतांचा आकडा 550 सांगिला आहे. परंतु, केदारनाथ येथील कॉंग्रेसच्‍याच आमदारांनी कमीत कमी 4 ते 5 हजार जणांचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा केला आहे.

एवढ्या भीषण संकटानंतर आणखी एक संकट आवासून उभे आहे. पुरानंतर सर्वत्र मलबा पसरलेला आहे. मलब्‍याखाली हजारो लोकांचे मृतदेह असण्‍याची भीती असून ते बाहेर काढण्‍यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. त्‍यामुळे तिथेच मृतदेह कुजण्‍याची शक्‍यता आहे.

उत्तराखंडमध्‍ये शेकडो लोकांचा मृत्‍यू झाला आहे. अनेक जण मलब्‍याखाली गाडले गेले आहेत. हे मृतदेह बाहेर काढता येतील का तसेच काढण्‍यात यश आल्‍यास त्‍यांची ओळख पटेल का, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.