आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधाला नवे वळण, नाहरगड किल्ल्यात आढळला युवकाचा मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- पद्मावती चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाला जयपूरमध्ये नवे वळण आणि रंग मिळाला आहे. नाहरगड येथील किल्ल्याच्या ४० फूट उंच तटबंदीवर ४० वर्षीय तरुण चेतन कुमार सैनीचा मृतदेह दोरावर लटकताना आढळून आल्याने खळबळ उडाली.


भल्या सकाळीच गावातील लोकांना हा मृतदेह लटकताना दिसून आला. घटनास्थळाच्या जवळ १५ चिऱ्यांवर कोळशाने पद्मावती चित्रपटाशी संबंधित वादग्रस्त विधाने लिहिलेली होती. वास्तविक हत्ये प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यासजातीय रंग देण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. चेतन नाहरीतील ज्ञानमार्ग पंचमुखी कॉलनीचा रहिवासी होता.  आर्टिफिशियल ज्वेलरीचा त्याचा व्यवसाय होता. पोलिसांनी सकाळी ९ ला हत्येची माहिती मिळाली. दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृतदेह खाली काढण्यात आला.

 

चेतनचा मृत्यू: आत्महत्या की हत्या..आणि पद्मावतीला ट्विस्ट का ?

> आत्महत्या यामुळे नाही..

- परिसरातील चिऱ्यांवर कोळशाने विधाने लिहिलेली आहेत. चेतनची हातांवर कोळशाच्या खुणा नाहीत.
- चेतनचा मृतदेह लटकलेला दोर जाड असून त्यावर आत्महत्या करणे अतिशय कठीण वाटते.
- चेतनने सायंकाळी ५.३० वाजता सेल्फी घेतली होती. रात्री ९ पर्यंत घरी परतेल. जेवणाची तयारी करून ठेव, असे त्याने पत्नीला फोनवरून सांगितले होते.

 

> हत्येचा यामुळे संशय..
- चेतनचा त्याच्या व्यवसायात काही लोकांशी उसणवारीवरून वाद होता. अलीकडे तो सिकरला उसणे पैसे आणण्यासाठी गेला होता. उसनवारीतून हत्येचा संशय आहे.

- मृतदेह लटकत होता. ती दोरी नवीकोरी होती. चेहऱ्यावर किरकोळ जखमांचे व्रण आढळून आले होते.
- प्राथमिक तपासात चेतनने मद्यपान केले होते. मात्र चेतन मद्यपान करत नसे, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

 

दोन चेतन

एक नाहरी नाक्यावरचा
तटा जवळ ज्या चेतनचा मृतदेह आढळून आला तो मूळचा नाहरी नाक्याचा रहिवासी होता. त्याला पद्मावतीशी जोडण्यात आले. चेतन तांत्रिकला मारण्यात आले, असे दगडांवर लिहिण्यात आले होते.

 

> दुसरा पद्मावतीचा
 जायसीच्या पद्मावतमध्ये चेतन तांत्रिक रतन सिंहांच्या दरबारी होता, असा उल्लेख सापडतो. रतन सिंह यांनी त्याला दरबारातून काढले तेव्हा तो खिलजीला जाऊन मिळाला आणि त्याने पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल माहिती दिली होती, असे त्यात म्हटले आहे.

 

तरुणाची पटली ओळख...

- घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पद्मावती चित्रपटाशी निगडित धमकी दगडावर लिहिलेली आढळली. तथापि, ती धमकी याच व्यक्तीच्या संदर्भात आहे अथवा नाही, हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
- मृत युवकाचे नाव चेतन शर्मा असे सांगण्यात आले आहे. तो शास्त्रीनगरचा रहिवासी आहे.

- सध्या पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्या आणि खून या दोन्ही अँगलने तपास सुरू केला आहे. यासोबतच एका दगडावर चेतन तांत्रिक असेही लिहिल्याचे आढळले.
- मृत तरुणाजवळ मुंबईचे एक तिकीटही आढळले आहे.

 

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
‘पद्मावती’च्या प्रदर्शनास स्थगिती देण्याच्या मागणीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. अशा याचिका चित्रपटांच्या विरोधास चालना देतात, असे न्यायालयाने म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमध्ये चित्रपटाचा प्रीमियर करण्याचा सल्ला दिला आहे.

 

पद्मावती चित्रपटावरून सुरू आहे वाद...
- राजस्थानात करणी सेना, भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी इतिहासाशी छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. राजपूत करणी सेने म्हटले आहे की, या चित्रपटात पद्मिनी आणि खिलजीदरम्यान इंटिमेट सीन चित्रित करण्यात आल्याने जनभावनेचा अनादर झाला आहे. यामुळे प्रदर्शनापूर्वी चित्रपटाला राजपूत प्रतिनिधींना दाखवले जावे.

 

आतापर्यंत काय झाले?
- पद्मावती चित्रपटाला विरोध मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकपर्यंत पोहोचला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि यूपीमध्ये सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
- राजस्थानच्या राजपूत करणी सेनेशिवाय राजघराणेही चित्रपटाच्या विरोधात आहे. प्रदर्शित करण्यापूर्वी तो आम्हाला दाखवावा अशी त्यांची मागणी आहे.
- राजनाथ सिंह, उमा भारती, लालू प्रसाद यादव, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी जनभावना लक्षात घेण्याचे वक्तव्य केले आहे.
- गुरुवारी राजपूतांनी चित्तोडगड किल्ला बंद ठेवून निदर्शने केली होती.
- करणी सेनेने शूर्पणखेप्रमाणे दीपिका पदुकोणचे नाक कापणे, हरियाणाच्या भाजप नेत्याने दीपिका आणि भन्सालीचे शिर कापल्यास 10 कोटींचे बक्षीस जाहीर केले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पद्मावती व जातीय रंग...

बातम्या आणखी आहेत...