आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाची वाट पाहत होती नवरी, सकाळ होताच घडले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मरकच्चो (कोडरमा)- झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील सोनेडीह ढेबवा गावातील शिक्षक जितेंद्रकुमार वर्णवाल (२८) यांचा गुरुवारी रात्री रामगडच्या संध्याचा विवाह झाला होता. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता तो नववधूला घेऊन घरी परतला. घरी जेवणावळीची तयारी सुरू होती. तेवढ्यात जितेंद्र गायब झाला. शनिवारी सकाळी त्याच्या घराजवळील एका विहिरीत मृतदेह आढळला. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली.


त्याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी तो सहा वाजता घरातून बाहेर पडला. रात्री आठपर्यंत तो घरी परतला नव्हता. नातेवाइकांंनी त्याचा शोध सुरू केला. रात्री दहाच्या सुमारास पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. शनिवारी सकाळी नातेवाइकांना त्याच्या घराजवळील विहिरीजवळ जितेंद्रचे जॅकेट, घड्याळ, मोबाइल व चप्पल आढळली. विहिरीत डोकावून पाहिले असता जितेंद्रचा मृतदेह तरंगताना दिसला. सकाळी सातच्या सुमारास पोलिस विहिरीजवळ आले. त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यास नकार दिला. पोलिसांनी श्वानपथकास बोलावले. त्यानंतर श्वान एक तास विहिरीच्या  आजूबाजूला घुटमळत होते. नंतर तो गावाबाहेरील उत्क्रमित मध्य शाळेजवळ गेला. तेथून पुन्हा माघारी फिरला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. 
पोलिस निरीक्षक रमाकांत तिवारी म्हणाले, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच जितेंद्रची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली हे समजेल. जितेंद्र साहेबगंज जिल्ह्यातील तालझाडी भागात असलेल्या एका प्राथमिक शाळेत नोकरीस होता.


नातेवाइकांशी झाला होता वाद
पत्नी संध्या हिने पोलिसांना सांगितले, शुक्रवारी सायंकाळी जितेंद्रचे त्याचे नातेवाइक विरेंद्र वर्णवाल,  सतेंद्र वर्णवाल यांच्यासोबत भांडण झाले होते. खोलीत आले तेव्हा जितेंद्रच्या चेहऱ्यावर तणाव होता. काही वेळातच तो घराबाहेर पडला. शनिवारी पहाटे पाच वाजता त्याचा मृतदेह सापडल्याचे कळले.


फोटो: अयूब खान
पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...