आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व‍डील मुलीचा अंत्‍यसंस्‍कार करून परतले, ती बाजारात फिरताना दिसली, सर्व Shocked

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजमगड - येथील एका महिलेची तेरवी करून तिच्‍या कुटुंबीयांनी तिच्‍या खुनाची तक्रार पोलिस दिली. दरम्‍यान, अचानक ती बाजारपेठेत फिरताना दिसली. पोलिसांनी घटनास्‍थळी येत तिला ताब्‍यात घेतले. आरती रमेश चौरसिया असे तिचे नाव आहे.
वडिलांनी केला अंत्‍यसंस्‍कार
> 21 जूनपासून आरती गायब होती.
> तिच्‍या कुटुंबीयांनी तिची खूप शोधाशोध केली. परंतु, ती सापडली नाही. त्‍या नंतर तिच्‍या पतीने 23 जूनला पोलिसांत तक्रार दाखल केली.
> याच दरम्‍यान मिर्जापूरमध्‍ये 27 जूनला एक मृतदेह सापडला. तो आरतीचाच असल्‍याची ओळख तिचे वडील अशोक यांनी पटवली.
> त्‍यांनी तो मृतदेह ताब्‍यात घेऊन अंत्‍यसंस्‍कारही केला.

मार्केटमध्‍ये दिसली
> तिच्‍या वडिलांनी 29 जूनला गंभीरपूर पोलिस ठाण्‍यात तिच्‍या सासरकडच्‍या व्‍यक्‍तींविरुद्ध खुनाची तक्रार नोंदवली.
> पोलिसांनी आरतीचे पती रमेश चौरसिया, दीर मुन्ना, संजय आणि सासू गीता देवीवर गुन्‍हा दाखल केला.
> याच दरम्‍यान आरती बिंद्राबाजारात फिरताना दिसली.
> पोलिसांनी तिला ताब्‍यात घेतले.
आरतीने काय सांगितले ?
> पोलिस चौकशीत आरतीने सांगितले, माझा पती माझ्या चरित्रावरून माझ्यावर संशय घेत होता. एवढेच नाही तर सासरकडचे छळ करत होते.
> त्‍यामुळे त्रस्‍त होऊन मी घर सोडले.
पुढील स्लाइड्स पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)