आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: 250 कोटींच्या गॅस कंपनीने केवळ 63 लाखांसाठी घेतले 64 निष्पाप बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष भंडारी : यानेच पैशापायी रोखला बालकांचा श्वास - Divya Marathi
मनीष भंडारी : यानेच पैशापायी रोखला बालकांचा श्वास
लखनऊ- प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स कंपनीचा संचालक मनीष भंडारी असून तोच गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेस जबाबदार आहे. पुष्पा सेल्स कंपनीची सुरुवात १९८५ मध्ये चंद्रशेखर भंडारी यांनी केली. कंपनीचे पायाभूत मूल्य २१ कोटी असून २०१०-११ मध्ये या कंपनीत २५० कोटी रुपयांची उलाढाल झाली. इतकी मोठी कंपनी असूनही मनीषने फक्त ६३ लाख रुपयांसाठी प्राणवायू पुरवठा थांबवून टाकला. कंपनीने २०१५ मध्ये गोरखपूरमध्ये कारखाना सुरू केला. 

देयकाचा हा वाद २३ नाेव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाला. कंपनीचे लखनऊत कार्यालय व नोएडात मुख्यालय आहे. कंपनीत ५ संचालक असून पुष्पा हेल्थकेअर सर्व्हिसेस या समूहाची अन्य एक कंपनी आहे. २००३ मध्ये सुरू झालेली ही कंपनी ऑपरेशन थिएटर हायटेक बनवण्यासाठी उपकरण तसेच एलईडी बल्ब बनवण्याचे काम करते. त्यांचे २०० कर्मचारी आहेत. चंद्रशेखर भंडारीच्या ५ कंपन्या असून त्यात त्याची मुले, सुना, पत्नी तसेच व्याही हे संचालक तसेच भागीदार आहेत. मनीषचे लखनऊच्या ला मार्टिनिअरे शाळेत शिक्षण झाले. साक्षी भसीन यांच्याशी त्याचे लग्न झाले. १ ऑगस्ट २०१७ रोजी कंपनीने रुग्णालयास लिहिलेल्या पत्रानुसार, ६३ लाख रुपये थकीत असल्याने यापुढे सिलिंडर पुरवठा केला जाणार नाही. 

करार नसतानाही त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत सिलिंडर पुरवठा केला. मोदी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण मोदी यांच्या मते, २०१५ मध्ये गोरखपूरच्या बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाशी प्राणवायू सिलिंडर पुरवठ्यासाठी करार झाला. मोदी कंपनीकडून बीआरडीला रोज १५० ते २०० सिलिंडर पुरवले जायचे. यासाठी दरमहा ४ ते ५ लाखांचे देयक व्हायचे. दीड वर्षे विनाअडथळा प्राणवायू पुरवठा सुरू होता. पण मार्च २०१७ मध्ये बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणतीही कल्पना किंवा नोटीस न देता मोदी केमिकल्सकडून प्राणवायू सिलिंडर पुरवठ्यावर बंदी घातली. मनीष भंडारीचे अनेक नातेवाईक लखनऊत राहतात. या ठिकाणी पोलिस तपास करत आहेत.

प्राचार्याने पत्नीच्या माध्यमातून मागितले २ लाखांचे कमिशन
गोरखपूर- या संपूर्ण प्रकरणात डॉ. राजीव मिश्रा यांची भूमिका संशयास्पद आहे. ‘दैनिक भास्कर’ने बीआरडीमधील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, डॉ. मिश्रा यांनी कमिशनच्या नादात पुष्पा सेल्स कंपनीची देयके थकविली होती. सूत्रांच्या मते, त्यांनी पत्नीच्या माध्यमातून कमिशनची मागणी केली होती. त्यांची पत्नीही बीआरडीमध्ये आयूष विभागात डॉक्टर आहे. त्यांच्या पत्नीने पुष्पा सेल्सकडून २ लाख आणि मोदी कंपनीकडून (पूर्वी सिलिंडर पुरवठा करणारी कंपनी) ५० हजारांचे कमिशन मागितले होते. कमिशन न मिळाल्याने देयके थांबवली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, ९ जुलै २०१७ आणि त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रुग्णालयाचा दौरा केला तेव्हा दोन्हीवेळा त्यांनी २-२ तासांच्या बैठका घेतल्या. त्या वेळी प्राचार्यांनी रुग्णालयात नियुक्त केलेल्या ४०० कर्मचाऱ्यांचा पगार, नियुक्ती तसेच बांधकामासंबंधी समस्येवर चर्चा केली. पण, प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक शब्दही सांगितला नाही. वास्तविक जुलै ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान गॅस अधिक लागतो. कारण, या मोसमात इन्सेप्लायटिसचा आजार वाढतो. आणखी आश्चर्य म्हणजे, ३१ मार्च २०१७ रोजी मोदी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडसोबतचा करार रद्द केला होता. त्यानंतर अलाहाबादच्या इम्पिरिअल कंपनीकडून सिलिंडर घेतले गेले. 

पुष्पा कंपनीकडून द्रवपदार्थांचा तर इम्पिरिअलकडून सिलिंडर पुरवठा व्हायचा. इम्पिरिअल ही काळ्या यादीतील कंपनी असल्याचेही म्हटले जाते. नियमानुसार, निविदा काढून सिलिंडरचे कंत्राट द्यायला हवे होते. पण, फक्त कागदी घोडे नाचवूनच अलाहाबादच्या कंपनीशी करार करण्यात आला. डॉ. मिश्रार यांनी २ ऑगस्ट रोजी पुष्पा सेल्सची ६३ लाख आणि मोदी केमिकल्सची २० लाख रुपयांची थकबाकी देण्यासाठी लखनऊच्या वैद्यकीय शिक्षण महासंचालकांना (डीजीएमई) पत्र पाठवले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी प्राचार्यांच्या खात्यात २२ लाख रुपयांची रक्कमही जमा झाली. तरीसुद्धा मिश्रा यांनी देयक दिले नाही. मात्र, ही रक्कम आपल्याला ७ ऑगस्टला मिळाल्याचा मिश्रा यांचा दावा आहे. तथापि, दुर्घटना घडल्यानंतर वाद उद्भवल्यानंतर त्यांनी ११ ऑगस्ट रोजी पुष्पा सेल्स अँड प्रायव्हेड लिमिटेडला २२ लाख रुपये दिले.
बातम्या आणखी आहेत...